सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : शिवसेना जिल्हा प्रमुख संजय आंग्रे, जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांच्या नेतृत्वाखाली सरंबळ गावातील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलीस अधिक्षक यांची जिल्हाधिकारी कार्यालय येथे भेट घेतली. तसेच जिल्ह्यात होत असलेल्या व्हिडिओ गेम पार्लरच्या गैरप्रकाराबाबत लक्ष वेधले.

हे व्हिडिओ गेम पार्लर विरंगुळा म्हणून जिल्हाधिकारी कार्यालय उपचिटणीस शाखा यांच्याकडून अटी शर्तीच्या आधारावर दिली जाते.परंतु या दिलेल्या अटी शर्तीचे पालन न करता.मोठ्या प्रमाणावर लुटमार होत आहे.याचा तरुणाईला मोठ्या प्रमाणावर त्रास होत आहे. झटपट श्रीमंत होण्यासाठी तरुणवर्ग मोठ्या प्रमाणावर आकर्षित होतात.

परंतु त्यांचा भ्रम निरास होऊन ते आत्महत्येसारखे पाऊल उचलतात.तरी यावर प्रतिबंध घालावेत अशी मागणी केली.यावर जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी यावर आपण योग्य ती कारवाई करू.परंतु आपण देखील या गेमकडे आकर्षित होऊ नये.यावर तरुणांचे प्रबोधन करावे असा सल्ला दिला.