सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त नाधवडे महादेव मंदिर परिसरात 18 ते 20 मार्च दिवशी जाणता राजा या महानाट्याचे आयोजन केले आहे. त्यामुळे समस्त सिंधुदुर्गकरांना हे नाटक अनुभवता येणार आहे.

सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि जिल्हा प्रशासनाच्यावतीने शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावर आधारीत ‘जाणता राजा’ या महानाट्याचे आयोजन 18 ते 20 मार्च या कालावधीत नाधवडे महादेव मंदिर , वैभववाडी येथे सायंकाळी 6.30 ते 10.00 या वेळेत होणार आहे. दर दिवशी सहा ते सात हजार प्रेक्षक पाहतील एवढी आसन व्यवस्था करण्यात आली आहे.

हे महानाट्य सर्व नागरिकांसाठी मोफत असणार आहे. तरी जिल्ह्यातील नागरिकांनी जाणता राजा हे महानाट्य पाहण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.