मोठी बातमी..! अभिनेत्री पूनम पांडेने घेतला जगाचा निरोप

मुंबई ( वृत्तंसंस्था ) अभिनेत्री पूनम पांडे हिचा गुरुवारी रात्री गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाने मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. वयाच्या अवघ्या 32 व्या वर्षी तिने जगाचा निरोप घेतल्याची बातमी ऐकून चाहत्यांना धक्का बसला आहे. मात्र, अद्याप याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. ही धक्कादायक बातमी त्यांच्याच अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. पूनम पांडेच्या ताज्या पोस्टने आता संपूर्ण जगाला… Continue reading मोठी बातमी..! अभिनेत्री पूनम पांडेने घेतला जगाचा निरोप

निवडणुकीपूर्वी ED कारवाई म्हणजे लोकशाहीलाच**;रघुराम राजन यांच मोठं विधान

जयपूर ( वृत्तसंस्था ) आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी आज थेट मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. राजस्थानमधील जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये माध्यमांशी संवाद साधताना देशातील विविध राज्यांमध्ये होत असलेल्या अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) कारवाई चुकीच्या असून, हा भारतीय लोकशाहीला हा धोका असल्याचे त्यांनी म्हणाले. केवळ विरोधकांना तुरुंगात टाकून सर्व काही साध्य होणार नाही. विरोधकच तुरुंगात असतील,… Continue reading निवडणुकीपूर्वी ED कारवाई म्हणजे लोकशाहीलाच**;रघुराम राजन यांच मोठं विधान

Budget 2024: मोदी सरकारचा अखेरचा अर्थसंकल्प सादर;आता वेध लोकसभा रणांगणाचे

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) मोदी सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प 2.0 नव्या संसदेत आज म्हणजेच गुरुवारी सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी सादर केला जात आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन आपल्या कार्यकाळातील सहावा अर्थसंकल्प सादर करत आहेत. हा अंतरिम अर्थसंकल्प असेल पण या मिनी बजेटमध्येही सरकारकडून अनेक मोठ्या घोषणांची अपेक्षा सर्वसामान्यांना आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या, देशाची अर्थव्यवस्था योग्य दिशेने चालली… Continue reading Budget 2024: मोदी सरकारचा अखेरचा अर्थसंकल्प सादर;आता वेध लोकसभा रणांगणाचे

जर्मनीच्या शिष्टमंडळाने घेतली वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट

मुंबई ( प्रतिनिधी ) जर्मनीच्या शिष्टमंडळाने दिनांक 30 जानेवारी रोजी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची मंत्रालयात भेट घेतली. जर्मनी देशाला मागणीप्रमाणे वैद्यकीय क्षेत्रातील विविध कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी सहकार्य करण्यात येणार असल्याचे श्री मुश्रीफ यांनी सांगितले. महाराष्ट्रातील तरुणांच्या कौशल्य विकासासाठी आणि रोजगारासाठी जर्मनीला पाठवण्या विषयी चर्चा करण्यात आली. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्यासह… Continue reading जर्मनीच्या शिष्टमंडळाने घेतली वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट

रोहन बोपण्णाने रचला इतिहास; ग्रँड स्लॅम जिंकणारा जगातील सर्वात वयस्कर खेळाडू

आंतरराष्ट्रीय ( वृत्तसंस्था ) रोहन बोपण्णा आणि मॅथ्यू एबडेन या जोडीने ऑस्ट्रेलियन ओपन ( Australian Open ) पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावले आहे. वयाच्या 43 व्या वर्षी बोपण्णाचे हे पहिले ग्रँडस्लॅम जेतेपद आहे. बोपण्णा ग्रँड स्लॅम जिंकणारा सर्वात वयस्कर टेनिसपटू ठरला आहे. या विजयासह बोपण्णा आता डब्ल्यूटीए क्रमवारीत दुहेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकाचा खेळाडू बनला आहे.… Continue reading रोहन बोपण्णाने रचला इतिहास; ग्रँड स्लॅम जिंकणारा जगातील सर्वात वयस्कर खेळाडू

न्यूमोनियाने पाकिस्तानमध्ये वाढवली चिंता; पंजाबमध्ये ही 200 हून अधिक मुलं दगावली

पंजाब ( वृत्तसंस्था ) पाकिस्तानातील पंजाब प्रांतात कडाक्याच्या थंडीमुळे निमोनियामुळे 200 हून अधिक मुलांचा मृत्यू झाला आहे. पंजाब सरकारने शुक्रवारी मृत्यूची पुष्टी केली आणि सांगितले की ते गेल्या तीन आठवड्यांत झाले आहेत. पंजाबच्या काळजीवाहू सरकारच्या म्हणण्यानुसार, बहुतेक मृत मुलांना न्यूमोनिया लसीकरण मिळाले नव्हते, कुपोषित होते आणि अपुऱ्या स्तनपानामुळे त्यांची प्रतिकारशक्ती कमकुवत झाली होती. परिस्थितीचे गांभीर्य… Continue reading न्यूमोनियाने पाकिस्तानमध्ये वाढवली चिंता; पंजाबमध्ये ही 200 हून अधिक मुलं दगावली

अयोध्या प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला; जग काय म्हणतंय ?

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) अयोध्येतील राम मंदिराचा अभिषेक सोमवारी पूर्ण झाला. हा कार्यक्रम देशातील तसेच परदेशातील भारतीयांनी साजरा केला. काही परदेशी लोकांनी राम मंदिराच्या अभिषेकला ‘दुसरी दिवाळी’ किंवा ‘हिंदूंसाठी मक्का’ असे संबोधले. न्यूयॉर्कमधील टाइम स्क्वेअरसह प्रमुख भागात भगवान रामाची चित्रे लावण्यात आली. जपान, इंडोनेशिया, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, ब्रिटन आणि इतर देशांतील भारतीयांनी भगवे झेंडे… Continue reading अयोध्या प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला; जग काय म्हणतंय ?

392 खांब, 44 दरवाजे, 5 मंडप; जाणून घ्या अयोध्या श्री राम मंदिराचं वेगळेपण

अयोध्या ( वृत्तसंस्था ) अयोध्या श्री राम मंदिर भाविकांसाठी उद्या दिनांक 23 जानेवारी पासून खुले होणार आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक येऊन भगवान श्री राम प्रभुंचे दर्शन घेऊ शकणार आहेत. अयोध्येचे राम मंदिर जितके भव्य आहे तितकेच ते भाविकांसाठी आधुनिक सुविधांनी सुसज्ज असेल. राम मंदिराचा स्वतःचा जलशुद्धीकरण केंद्र आणि पॉवर सबस्टेशन असेल. याशिवाय २५ हजार लोकांची… Continue reading 392 खांब, 44 दरवाजे, 5 मंडप; जाणून घ्या अयोध्या श्री राम मंदिराचं वेगळेपण

मीडिया क्षेत्रात ‘अदानीं’ची नवी चाल; ‘या’ वृत्तसंस्थेत वाढवली भागीदारी

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) गौतम अदानी समूहाने IANS इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या वृत्तसंस्थेमध्ये आपला हिस्सा वाढवला आहे. शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत, समूहातील आघाडीची कंपनी अदानी एंटरप्रायझेसने सांगितले की, त्यांची उपकंपनी AMG मीडिया नेटवर्क्स लिमिटेडने IANS इंडिया प्रायव्हेट लिमिटेडमध्ये 5 कोटी रुपयांचे नवीन शेअर्स खरेदी केले आहेत. AMG Media Networks ने मतदान अधिकारांसह IANS शेअर्सची… Continue reading मीडिया क्षेत्रात ‘अदानीं’ची नवी चाल; ‘या’ वृत्तसंस्थेत वाढवली भागीदारी

धक्कादायक…! मुंबई ते बेंगळुरू प्रवासादरम्यान टॉयलेटमध्ये गेला अन् फसला

मुंबई ( प्रतिनिधी ) मुंबईहून बेंगळुरूला विमानाने जात असताना एक प्रवासी विमानाच्या टॉयलेटमध्ये अडकला. त्यानंतर तो प्रवास संपेपर्यंत टॉयलेटमध्येच अडकून राहिला. बेंगळुरूला पोहोचल्यानंतर कसा तरी दरवाजा तोडून त्याला बाहेर काढण्यात आले. ही धक्कादायक घटना मुंबईहून बेंगळुरूला जाणाऱ्या स्पीजेट फ्लाइट क्रमांक एसजी-268 ची आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, विमानाने मंगळवारी पहाटे 2 वाजता मुंबई विमानतळावरून उड्डाण केले. सीट… Continue reading धक्कादायक…! मुंबई ते बेंगळुरू प्रवासादरम्यान टॉयलेटमध्ये गेला अन् फसला

error: Content is protected !!