जयपूर ( वृत्तसंस्था ) आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी आज थेट मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. राजस्थानमधील जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये माध्यमांशी संवाद साधताना देशातील विविध राज्यांमध्ये होत असलेल्या अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) कारवाई चुकीच्या असून, हा भारतीय लोकशाहीला हा धोका असल्याचे त्यांनी म्हणाले. केवळ विरोधकांना तुरुंगात टाकून सर्व काही साध्य होणार नाही. विरोधकच तुरुंगात असतील, तर आम्हाला काय पर्याय उरणार ? असा ही सवाल त्यांनी यावेळी केल.

नोकऱ्या कमी झाल्या

पुढे बोलताना रघुराम राजन म्हणाले की, जर तुम्ही भारतीय नोकऱ्यांच्या नियुक्त्यांचा आलेख पाहिला तर गेल्या 10 वर्षांत हा खाली जात आहे. 7 टक्के वाढ झाली असेल तर ती शेतीत झाली आहे. आज बाहेर पुरेशा नोकऱ्या नसल्यामुळे लोक पुन्हा शेतीकडे जात आहेत. या आधीही राजन यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. मात्र, त्यांनी नाव घेतले नाही. मात्र त्यांचा हा इशारा मोदी सरकारवर निशाणा साधण्यासाठी असल्याचे मानले जात आहे.

‘हा’ महोत्सव 5 फेब्रुवारीपर्यंत चालणार..!

तत्पूर्वी, साहित्याचा महाकुंभ अशी वेगळी ओळख असलेल्या जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलच्या 17 व्या आवृत्तीला आज हॉटेल क्लार्क्स आमेर येथे सुरुवात झाली. उपमुख्यमंत्री दिया कुमारी यांनी उद्घाटन केले. यामध्ये देशभरातील आणि जगभरातील 550 साहित्यिक, लेखक आणि संपादक वक्ते म्हणून सहभागी होणार आहेत. या सोहळ्याला रघूराम राजन यांनी ही उपस्थिती लावली.