आंतरराष्ट्रीय ( वृत्तसंस्था ) रोहन बोपण्णा आणि मॅथ्यू एबडेन या जोडीने ऑस्ट्रेलियन ओपन ( Australian Open ) पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावले आहे. वयाच्या 43 व्या वर्षी बोपण्णाचे हे पहिले ग्रँडस्लॅम जेतेपद आहे. बोपण्णा ग्रँड स्लॅम जिंकणारा सर्वात वयस्कर टेनिसपटू ठरला आहे. या विजयासह बोपण्णा आता डब्ल्यूटीए क्रमवारीत दुहेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकाचा खेळाडू बनला आहे.

रोहन आणि मॅथ्यू एबडेन यांनी इटलीच्या सिमोन बोलेली आणि आंद्रिया वावासोरी यांचा त्याने 7-6, 7-5 असा पराभव केला. बोपण्णा आणि त्याचा सहकारी मॅथ्यू एबडेन यांनी या सामन्यात पूर्णपणे वर्चस्व गाजवले. या सामन्यात या जोडीने सिमोन बोलेली आणि अँड्रिया वावसोरी यांचा सरळ सेटमध्ये पराभव केला. रोहन आणि मॅथ्यू एबडेन या दोघांनी सामन्यात एकूण आठ एसेस मारले, तर समोरची जोडी फक्त एकदाच असे करू शकली.

रोहन बोपण्णाने मॅथ्यू एब्डेनसोबत पहिल्यांदाच ग्रँडस्लॅममध्ये जोडी बनवली. रोहनने कारकिर्दीतील पहिले पुरुष दुहेरी ग्रँडस्लॅम विजेतेपदही जिंकले आहे. यापूर्वी 2017 मध्ये रोहनने कॅनडाची जोडीदार गॅब्रिएला डॅब्रोव्स्कीसोबत फ्रेंच ओपनचे विजेतेपद पटकावले होते. सामन्यानंतर रोहन म्हणाला, मी 43 वर्षांचा नाही तर 43 व्या स्तरावर पोहोचलो आहे. माझ्या अप्रतिम ऑस्ट्रेलियन जोडीशिवाय हा विजय शक्यच झाला नसता. अशी ही प्रतिक्रिया यावेळी दिली.