नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) मोदी सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प 2.0 नव्या संसदेत आज म्हणजेच गुरुवारी सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी सादर केला जात आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन आपल्या कार्यकाळातील सहावा अर्थसंकल्प सादर करत आहेत. हा अंतरिम अर्थसंकल्प असेल पण या मिनी बजेटमध्येही सरकारकडून अनेक मोठ्या घोषणांची अपेक्षा सर्वसामान्यांना आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या, देशाची अर्थव्यवस्था योग्य दिशेने चालली आहे. आमच्या सरकारचे लक्ष पारदर्शक कारभारावर आहे. अर्थमंत्र्यांनी 20 मिनिटे केंद्र सरकारच्या योजनांची गणना केली आणि भारताच्या विकासाच्या गतीवर चर्चा केली. निर्मला म्हणाल्या की, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पुढील 5 वर्षांत ग्रामीण भागात आणखी दोन कोटी घरे बांधली जातील.

कोविड नंतर एक नवीन जागतिक व्यवस्था तयार झाली आहे. अत्यंत कठीण काळात भारताने G-20 चे अध्यक्षपद स्वीकारले. कमी विकास दर आणि हवामान बदल यासारख्या समस्यांशी जग झगडत या गोष्टींना न जुमानता भारत आपली वाटचाल करण्यात यशस्वी झाला. यानंतर आता लोकसभा निवडणूकांसाठी निवडणूक आयोगाकडून हालचाली सुरु झाल्या असून, येत्या काही दिवसात लोकसभा निवडणूकीचं बिगूल वाजणार आहे. याकडे अनेकांच लक्ष लागलं आहे.