कोल्हापूर शहरातील सात बंदिस्त पार्किंगवर महापालिकेची कारवाई…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राजारामपुरी आणि शहरातील्या इतर परिसरातील काही पार्किंगमध्ये बांधकामे करुन पार्किंग बंदीस्त केली होती. या पार्किंगमध्ये वाहनांचे पार्किंग न झाल्याने मोठया प्रमाणात रस्त्यावर पार्किंग होत होते. त्यामुळे रहदारीस अडथळे निर्माण होत होता. त्यामुळे आज (बुधवार) ही बंदिस्त या पार्किंगवर कारवाई करण्यात आली. यामुळे महापालिकेच्या नगररचना विभाग, विभागीय कार्यालय, अतिक्रमण, इस्टेट, विद्युत आणि यांत्रिकी… Continue reading कोल्हापूर शहरातील सात बंदिस्त पार्किंगवर महापालिकेची कारवाई…

भोपळवाडी येथील शेतकऱ्याचा धारवाड येथे विजेचा धक्का बसून मृत्यू…

राशिवडे (प्रतिनिधी) :  राधानगरी तालुक्यातील भोपळवाडी येथील सुभाष लक्ष्मण शेलार (वय ४३) हे ऊस वाहतुकीच्या निमित्ताने हुबळी धारवाड परिसरात गेले होते. यावेळी ट्रक क्र. एमएच १० झेड ४३३४ मध्ये ऊस भरून रस्त्याने जात होते. यावेळी ट्रकमध्ये भरलेल्या ऊसाच्या वरील बाजूला विजेच्या तारा लोंबकळत होत्या. या तारा ऊसाला लागतात का, हे पाहण्यासाठी शेलार ट्रकवरती गेले असता… Continue reading भोपळवाडी येथील शेतकऱ्याचा धारवाड येथे विजेचा धक्का बसून मृत्यू…

सादळे-मादळे घाटात अलिशान बीएमडब्लू जळून खाक…

टोप (प्रतिनिधी) :  सादळे-मादळे घाटात काल (मंगळवार) रात्री ११ च्या सुमारास कारचा ब्रेक निकामी होऊन कार दगडावर आदळल्याने कार जळून खाक झाली. प्रसंगावधानाने चालकाने कारमधून उडी मारल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. गोवा येथील सलीम अहमद यांची बीएमडब्ल्यू  एम एच १२ बी एक्स ४५४५ ही गाडी शिरोली -मळवडी भागातील समीर मिस्त्री ( वय 30) यांच्याकडे… Continue reading सादळे-मादळे घाटात अलिशान बीएमडब्लू जळून खाक…

‘जय शिवराय’कडून पेठवडगाव परिसरातील ऊस तोडण्या बंद  

कोल्हापूर (प्रतिनिधी) : हार्वेस्टर मशीनने तोडलेल्या उसाची मोळी बांधणी एक टक्का करावी. पूरबाधित क्षेत्रातील ऊस प्राधान्याने तोडावा, या प्रमुख मागण्यांसाठी आज (बुधवार) जय शिवराय किसान संघटनेच्या वतीने पेठवडगाव परिसरातील ऊस तोडण्या बंद पाडल्या. यावेळी मोटरसायकल रँलीही काढण्यात आली. कारखानदार एक टक्का मोळी बांधणीसाठी ‌टाळाटाळ करीत आहेत. यासाठी आज पासून तोडी रोखायचे जय शिवरायने ठरवले होते.… Continue reading ‘जय शिवराय’कडून पेठवडगाव परिसरातील ऊस तोडण्या बंद  

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप…

टोप (प्रतिनिधी) : हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज (बुधवार) स्मृतिदिन आहे. या निमित्त विद्या विकास सहाय्यक मंडळ पुरस्कृत शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष कोल्हापुर जिल्हा यांच्यातर्फे आज शिरोली येथील न्यानदिप शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष जिल्हा संपर्क प्रमुख संजय वाडेकर यांच्या हस्ते स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन… Continue reading शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप…

रणजीत देशमुख यांची जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये आढावा बैठक 

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव व कोल्हापूर जिल्हा सह प्रभारी रणजीत भैया देशमुख यांनी कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये भेट दिली. कोल्हापूर दौऱ्यादरम्यान त्यांनी शिरोळ, हातकणंगले, इचलकरंजी येथे भेटी दिल्या. जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये प्रदेश सरचिटणीस गुलाबराव घोरपडे यांच्याशी तसेच तालुकाध्यक्ष यांच्याशी चर्चा करून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सूचनेनुसार राज्यभरात राबवण्यात येणाऱ्या जनजागरण अभियान संदर्भात… Continue reading रणजीत देशमुख यांची जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये आढावा बैठक 

विद्यापीठ, महाविद्यालयामध्ये ‘विद्यार्थी संसद’ उपक्रम राबवा : श्रीकांत देशपांडे

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महाविद्यालये व विद्यापीठांमध्ये ‘विद्यार्थी संसद’ (स्टुडंट पार्लमेंट) सारखे उपक्रम राबवून लोकशाही मूल्यांची व निवडणूक प्रक्रियेची प्रत्यक्ष माहिती विद्यार्थ्यांना करुन द्या, असे आवाहन प्रधान सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सभागृहात विविध जिल्ह्यांतील प्राचार्यांसोबत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, उप जिल्हा… Continue reading विद्यापीठ, महाविद्यालयामध्ये ‘विद्यार्थी संसद’ उपक्रम राबवा : श्रीकांत देशपांडे

शिरोली एमआयडीसी पोलिसांची धडक कारवाई : अवैध दारू विक्री करणाऱ्या चौघांना अटक 

टोप (प्रतिनिधी) : अवैध दारू विक्रीविरोधात शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजेश खांडवे यांनी धडक कारवाई सुरू केली आहे. गेल्या दोन दिवसांत त्यांनी कासारवाडी, जठारवाडी, शिये आणि मौजे वडगाव या ४ गावामध्ये धडक कारवाई करत सुमारे ७२ हजारांचे देशी-विदेशी व गावठी मद्य जप्त केले. याप्रकरणी ४ जणांना ताब्यात घेतले आहे. जठारवाडी (ता. करवीर)… Continue reading शिरोली एमआयडीसी पोलिसांची धडक कारवाई : अवैध दारू विक्री करणाऱ्या चौघांना अटक 

ढोलगरवाडीत २ कोटी ३५ लाखांचे ‘एमडी’ अंमली पदार्थ जप्त : दत्ता नलवडे

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील ढोलगरवाडी येथे मुंबईतील अमली पदार्थ विरोधी पथकाने अचानक छापा टाकला. यावेळी फार्महाऊसवर असणाऱ्या मुद्देमालासह केअरटेकर निखील लोहारला ताब्यात घेतले. तर यातील मुंबई येथे स्थायिक असणारा मुख्य आरोपी वकील हा ढोलगरवाडीचाच असून तो सध्या फरार आहे. या कारवाईत सुमारे २ कोटी ३५ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याची माहिती… Continue reading ढोलगरवाडीत २ कोटी ३५ लाखांचे ‘एमडी’ अंमली पदार्थ जप्त : दत्ता नलवडे

रांगोळीत तुटलेल्या विद्युत वाहिनीचा धक्का लागून म्हैशीचा मृत्यू

रांगोळी (प्रतिनिधी) : रांगोळी येथे तुटलेल्या विद्युत वाहिनीतून विजेचा धक्का लागून म्हैशीची जागीच मृत्यू झाला. तर एकाला वीजेचा जोराचा धक्का लागला. ही घटना आज (बुधवार) सकाळी घडली. या घटनेमुळे महावितरणच्या भोंगळ कारभारावर नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. मिळालेली माहिती अशी की, आज सकाळी ज्ञानदेव कुंभार आपली जनावरे चारण्यासाठी नदीकडे घेऊन गेले  होते. त्यावेळी त्यांच्या… Continue reading रांगोळीत तुटलेल्या विद्युत वाहिनीचा धक्का लागून म्हैशीचा मृत्यू

error: Content is protected !!