टोप (प्रतिनिधी) : हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज (बुधवार) स्मृतिदिन आहे. या निमित्त विद्या विकास सहाय्यक मंडळ पुरस्कृत शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष कोल्हापुर जिल्हा यांच्यातर्फे आज शिरोली येथील न्यानदिप शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष जिल्हा संपर्क प्रमुख संजय वाडेकर यांच्या हस्ते स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करु पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी शिवसेना ग्राहक संरक्षण जिल्हाप्रमुख दिपक यादव, सतिश पाटील, सचिन यादव, विनोद अंबी, प्रशांत कागले, राजहंस पाटील, प्रकाश यादव, शिवसैनिक उपस्थित होते.