दिवंगत अभिनेता पुनीत राजकुमार यांना कर्नाटक राज्याचा ‘सर्वोच्च मरणोत्तर’ पुरस्कार…

मुंबई (प्रतिनिधी) :   कन्नड सिनेसृष्टीतला  दिवंगत सुपरस्टार पुनीत राजकुमार  यांना कर्नाटक राज्याचा सर्वोच्च मरणोत्तर पुरस्कार देऊन सन्मानित केलं जाणार आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई   यांनी पुनीत राजकुमार यांना ‘कर्नाटक रत्न पुरस्कार’  देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याची घोषणा केली. मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले की,  पुनीत राजकुमार यांना मरणोत्तर कर्नाटक रत्न पुरस्कार प्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे. आज… Continue reading दिवंगत अभिनेता पुनीत राजकुमार यांना कर्नाटक राज्याचा ‘सर्वोच्च मरणोत्तर’ पुरस्कार…

अभिनेता अनिकेत विश्वासराव याच्यावर पत्नीला मारहाण केल्याचा गुन्हा दाखल…

पुणे (प्रतिनिधी) :  मराठी सिनेसृष्टीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध मराठी कलाकार अनिकेत विश्वासराव याच्यविरोधात कौटुंबिक हिंसाचार आणि मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे. पुण्यातील अलंकार पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे. अनिकेतची पत्नी स्नेहा चव्हाण हिने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अनिकेतच्या पत्नीने अनिकेतसह सासू, सासरे यांच्यावर कौटुंबिक हिंसाचार… Continue reading अभिनेता अनिकेत विश्वासराव याच्यावर पत्नीला मारहाण केल्याचा गुन्हा दाखल…

कळे येथे जुगार अड्ड्यावर छापा : दोघांवर कारवाई

कळे (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील कळे येथे मटका अड्ड्यावर छापा टाकून दोघांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्यांच्याकडून ७ हजार १३५ रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. याबाबत पोलीसांनी धनाजी उर्फ चंद्रकांत विलास पोवार (वय ३१, रा. कळे, चांभारवाडा) आणि अनिकेत कदम (रा. यवलुज, ता. पन्हाळा) यांच्याविरोधात कॉन्स्टेबल सनिराज पाटील यांनी कळे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली… Continue reading कळे येथे जुगार अड्ड्यावर छापा : दोघांवर कारवाई

‘मास्टर’ फेम साऊथचा सुपरस्टार विजयचे घर बाँबने उडवण्याची धमकी…

मुंबई (प्रतिनिधी) :  ‘मास्टर’  फेम साऊथचा सुपरस्टार विजयचे  घर बाँबने उडवणार असल्याचे तामिळनाडू राज्य पोलीस मुख्य नियंत्रण कक्षाला एक कॉल आला होता. ज्यामध्ये चेन्नईतील विजयच्या निवासस्थानी बॉम्ब ठेवण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. ही माहिती मिळताच पोलिस मुख्यालयाने तात्काळ अधिकाऱ्यांचे पथक, स्निफर डॉग आणि बॉम्ब निकामी पथकासह विजयच्या निलाकर्णई या निवासस्थानी धाव घेतली. मात्र, बॉम्ब शोधक… Continue reading ‘मास्टर’ फेम साऊथचा सुपरस्टार विजयचे घर बाँबने उडवण्याची धमकी…

शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन साजरा…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरातील निवृत्ती चौकात हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन आज (बुधवार) महाराष्ट्र रिक्षाचालक सेना, निवृत्ती चौक रिक्षा मित्र मंडळ व निवृत्ती तरुण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा करण्यात आला. यावेळी जेष्ठ शिवसैनिक पंडित पोवार यांच्या हस्ते बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करु पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र रिक्षाचालक सेना… Continue reading शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन साजरा…

राज्यात पहिलीपासूनच्या शाळा सुरु होण्याची शक्यता ?

मुंबई (प्रतिनिधी) :  राज्यातल्या शहरांमध्ये आठवी ते बारावी आणि ग्रामीण भागात पाचवी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत. त्यानंतर आता पहिलीपासूनच्या शाळा सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पहिलीपासूनचे वर्ग सुरू कऱण्यास शालेय शिक्षण विभाग अनुकूल असल्याची माहिती समोर आली आहे. या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मान्यता मिळाल्यावर अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे… Continue reading राज्यात पहिलीपासूनच्या शाळा सुरु होण्याची शक्यता ?

गोठे येथे ट्रॅक्टर-मोटर सायकलच्या  अपघातात  महिला ठार…

कळे (प्रतिनिधी) : ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर आणि मोटर सायकलच्या अपघातात शुभांगी गजानन कांबळे (वय २९, रा. बेळंकी, ता. कागल) ही महिला जागीच ठार झाली. तर मोटरसायकल चालविणारा तिचा भाऊ प्रदीप मारुती कांबळे (वय २२, रा. राजेंद्रनगर, कोल्हापूर)  हा सुदैवाने बचवला. ही घटना पन्हाळा तालुक्यातील गोठे-परखंदळे दरम्यानच्या रस्त्यावर काल (मंगळवार) सायंकाळी उशीरा घडली. पोलिसांकडून मिळालेली… Continue reading गोठे येथे ट्रॅक्टर-मोटर सायकलच्या  अपघातात  महिला ठार…

राधानगरी तालुक्याच्या आरोग्याधिकाऱ्यांचा स्त्युत्य उपक्रम…

राशिवडे (प्रतिनिधी) : राधानगरी तालुक्याचे आरोग्याधिकारी डॉ. राजेंद्र शेटे यांनी अभिमानास्पद उपक्रम राबवला आहे. त्यांनी राशिवडे गावामध्ये घरोघरी जाऊन ज्यांनी अजूनही कोव्हिड लसीकरण केले नाही अशा नागरिकांचे प्रबोधन करून त्यांचे लसीकरण करण्यात आले. राशिवडेतील ग्रामस्थ दिवसभर शेतीच्या कामात व्यस्त असल्यामुळे सायंकाळच्या सत्रात या मोहिमेचे नियोजन केले आहे. सायंकाळी पाच ते रात्री उशिरापर्यंत ही लसीकरण मोहीम… Continue reading राधानगरी तालुक्याच्या आरोग्याधिकाऱ्यांचा स्त्युत्य उपक्रम…

घोटवडे येथे गव्यांचा रहिवास आढळला

राशिवडे (प्रतिनिधी) : राशिवडे (ता. राधानगरी) परिसरात आढळून आलेले गवे नदीकाठाने घोटवडे येथील ढेरे नाळवा आणि स्टार्च प्रक्रिया एरिया या भागात गेल्याचे वन विभागाला आढळून आले आहे. तसेच येथे गव्यांचा रहिवास आढळला आहे. या ठिकाणी आढळलेल्या पाऊल खुणांवरून मादी आपल्या पिलासहित असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे वन विभागाने ग्रामस्थांना आवाहन केले आहे की, सदर परिसरात संध्याकाळी… Continue reading घोटवडे येथे गव्यांचा रहिवास आढळला

म्हसवे येथील अजित यादव यांना आदर्श पत्रकार पुरस्कार प्रदान  

गारगोटी (प्रतिनिधी) : म्हसवे (ता. भुदरगड) येथील पत्रकार अजित बाळासो यादव यांना श्रावस्ती बहुउद्देशीय सेवा संस्थेचा २०२१ चा आदर्श पत्रकार पुरस्कार प्रदान करण्यात आला. माजी खासदार निवेदिता माने यांच्या हस्ते व महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांच्या उपस्थित हा पुरस्कार देण्यात आला.  कार्यक्रम ना. बा. घोरपडे नाट्यगृह इचलकरंजीमध्ये संपन्न झाला. अजित यादव अनेक वर्षे सामाजिक… Continue reading म्हसवे येथील अजित यादव यांना आदर्श पत्रकार पुरस्कार प्रदान  

error: Content is protected !!