कोल्हापूर (प्रतिनिधी) : राजारामपुरी आणि शहरातील्या इतर परिसरातील काही पार्किंगमध्ये बांधकामे करुन पार्किंग बंदीस्त केली होती. या पार्किंगमध्ये वाहनांचे पार्किंग न झाल्याने मोठया प्रमाणात रस्त्यावर पार्किंग होत होते. त्यामुळे रहदारीस अडथळे निर्माण होत होता. त्यामुळे आज (बुधवार) ही बंदिस्त या पार्किंगवर कारवाई करण्यात आली.

यामुळे महापालिकेच्या नगररचना विभाग, विभागीय कार्यालय, अतिक्रमण, इस्टेट, विद्युत आणि यांत्रिकी विभागाने सात बंदीस्त पार्किंगवर संयुक्त कारवाई केली. ही कारवाई राजारामपूरी, महालक्ष्मी मंदिर परिसर, महाद्वार रोड, ताराबाई रोड याठिकाणी करण्यात आली. यावेळी बंदीस्त पार्किंग जेसीबी, कटरव्दारे पार्किेंग खुली करण्यात आली.

ही कारवाई उपशहर अभियंता हर्षजीत घाटगे, नारायण भोसले, नंदकुमार पाटील, बाबुराव दबडे, उपशहर रचनाकार रमेश मस्कर, कनिष्ठ अभियंता सुरेश पाटील, महादेव फुलारी, सुनिल भाईक, चेतन भारमल आदींनी केली.

तसेच ही कारवाई उद्या (गुरुवार) चालू राहणार असून काही बंदीस्त पार्किंग आणि शहरातील नालापात्रात अतिक्रमण करुन केलेली बांधकामे काढण्याची कारवाई सुरु राहणार आहे. तरी संबंधीत नागरीकांनी नाल्याचे पात्रात भरावा टाकून केलेली बांधकामे आणि पार्किंग बंदीस्त करुन केलेली अनाधिकृत बांधकामे स्वत:हून काढून घ्यावीत, असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.