अमल महाडिकांचा निधीचा धडाका; पर्यटन विकासमधून दक्षिणसाठी सव्वादोन कोटींचा निधी

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघाच्या विकासासाठी भरघोस निधी आणण्याचा धडाका माजी आमदार अमल महाडिक यांनी सुरूच ठेवला आहे. पर्यटन विकास आराखड्यातून दक्षिण साठी त्यांनी तब्बल सव्वा दोन कोटी रुपयांचा निधी खेचून आणला आहे. या निधीतून निगवे खालसा येथील नृसिंह सरस्वती स्वामी मंदिराजवळ रस्ते आणि गटारी करण्यासाठी 25 लाख रुपये, गिरगाव येथील… Continue reading अमल महाडिकांचा निधीचा धडाका; पर्यटन विकासमधून दक्षिणसाठी सव्वादोन कोटींचा निधी

भाजप ग्रामीण (पूर्व) जिल्हा उपाध्यक्षपदी प्रकाश देशमुख यांची निवड….

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून संपूर्ण महाराष्ट्रभर पक्ष बांधणीस सुरुवात झाली आहे.याच पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातीलही नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती करण्यात आल्या. यामध्ये आज भाजप जिल्हा ग्रामीण (पूर्व) उपाध्यक्षपदी प्रकाश बळवंत देशमुख यांची निवड करण्यात आली. प्रकाश देशमुख यांचे पन्हाळा तालुक्यातील ग्रामीण भागातील काम पाहता येणाऱ्या काळामध्ये (पूर्व) ग्रामीण चे जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर यांच्यासोबत चांगल्या प्रकारे पक्षाचे… Continue reading भाजप ग्रामीण (पूर्व) जिल्हा उपाध्यक्षपदी प्रकाश देशमुख यांची निवड….

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी घेतली आमदार सतेज पाटील यांची भेट

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांची गुरुवारी अजिंक्यतारा कार्यालय येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी या दोघांमध्ये विविध विषयावर चर्चा झाली. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे आज गुरुवारी कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. जिल्हाधिकारी कार्यालय येथे त्यांनी आढावा बैठक घेतल्यानंतर त्यांनी विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांची… Continue reading विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी घेतली आमदार सतेज पाटील यांची भेट

आमदार सतेज पाटील यांनी केली दिवंगत कॉम्रेड गोविंद पानसरे स्मारकाची पाहणी

आमदार सतेज पाटील यांनी प्रतिभानगर येथील दिवंगत ज्येष्ठ नेते कॉम्रेड गोविंदराव पानसरे स्मारकाच्या कामाची पाहणी केली. येत्या 20 फेब्रुवारी रोजी कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांच्या स्मृतीदिनी या स्मारकाचे लोकार्पण करण्यात येणार असल्याचे आ पाटील यांनी सांगीतले. कोल्हापुरातील प्रतिभानगर येथील महानगरपालिकेच्या वि. स. खांडेकर शाळेजवळ अडीच हजार चौरस फुटांच्या जागेत कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांचे स्मारक उभारण्यात येत… Continue reading आमदार सतेज पाटील यांनी केली दिवंगत कॉम्रेड गोविंद पानसरे स्मारकाची पाहणी

कोल्हापूर शहरातील रस्त्यांबाबतच्या अमल महाडिक यांच्या ‘त्या’ मागणीला यश

कोल्हापूर महानगरपालिकेची आर्थिक अवस्था बिकट असल्यामुळे कोल्हापूर शहरातील रस्त्यांची अवस्था दयनीय बनली आहे. विशेषतः कोल्हापूर शहरात प्रवेश करणारे रस्ते खड्डेमय बनले असल्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी देशभरातून येणाऱ्या भाविकांमधूनही कोल्हापुरातील रस्त्यांच्या दर्जाबद्दल नाराजी व्यक्त होत आहे. यावर उपाय म्हणून कोल्हापूर शहरात प्रवेश करणारे सर्व रस्ते सार्वजनिक बांधकाम खात्याने ताब्यात… Continue reading कोल्हापूर शहरातील रस्त्यांबाबतच्या अमल महाडिक यांच्या ‘त्या’ मागणीला यश

अखेर स्वाभिमानीच्या लढ्याला यश; कारखानदार जादा 100 साठी तयार

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) ऊस दरावरून स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांनी आज राष्ट्रीय महामार्ग चक्काजाम केला आहे. यामुळे दिवसभरात पुणे – बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर तब्बल दहा – दहा किलो मिटरच्या रांगा लागल्याचे चित्र होते. यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील काही कारखानदारांसोबत जिल्हाधिकारी कार्यालयात पुन्हा स्वाभिमानी सोबत चर्चा झाली असून. या चर्चाला यश आलं आहे.याबाबत स्वाभिमानी ने परिपत्रक काढत… Continue reading अखेर स्वाभिमानीच्या लढ्याला यश; कारखानदार जादा 100 साठी तयार

ऊस दराचा फैसला होणार ? ‘स्वाभिमानी’ सोबत कारखानदारांची पुन्हा खलबतं

टोप ( प्रतिनिधी ) ऊस दरावरून स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांनी आज राष्ट्रीय महामार्ग चक्काजाम केला आहे. यामुळे दिवसभरात पुणे – बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर तब्बल दहा – दहा किलो मिटरच्या रांगा लागल्याचे चित्र आहे. दरम्यान दुपारी श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी या आंदोलनाला भेट देत पाठिंबा व्यक्त केला आहे. दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील काही कारखानदार जिल्हाधिकारी कार्यालयात… Continue reading ऊस दराचा फैसला होणार ? ‘स्वाभिमानी’ सोबत कारखानदारांची पुन्हा खलबतं

जोपर्यंत निर्णय होत नाही तोवर महामार्गावरून उठणार नाही – राजू शेट्टी

( टोप प्रतिनिधी ) जोपर्यंत कारखानदार गुडघे टेकत नाहीत तोवर माघार नाही. काहीपण होवू दे अशी भुमिका स्वाभिमानीचे सर्वेसर्वा राजू शेट्टी यांनी घेतली आहे. आज सकाळपासून पुणे – बेंगलोर महामार्गावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने चक्काजाम आंदोलन सुरु केले आहे. यामुळे महामार्गावर लांबच – लांब वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत. यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, पोलिसांनी आम्हाला… Continue reading जोपर्यंत निर्णय होत नाही तोवर महामार्गावरून उठणार नाही – राजू शेट्टी

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली पंढरपूर आरोग्य शिबिराला भेट

पंढरपूर ( प्रतिनिधी ) महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण विभागाच्या वतीने श्री क्षेत्र पंढरपूर येथे संपन्न होणाऱ्या कार्तिकी वारीमध्ये “आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी” हे ब्रीद वाक्य घेऊन तीन दिवसीय महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. यानिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या शिबिराला भेट दिली. चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली कि,… Continue reading उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली पंढरपूर आरोग्य शिबिराला भेट

राज्यातील जनता सुखी, संपन्न राहो; मंत्री चंद्रकांत पाटील यांची विठुराया चरणी प्रार्थना

पंढरपूर ( प्रतिनिधी ) कार्तिकी एकादशी यानिमित्त आज उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते विठूरायाची शासकीय पूजा संपन्न झाली. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे उपस्थित राहून विठूरायाच्या चरणी लीन झाले. चंद्रकांत पाटील यांनी पाऊस कमी झाल्याने राज्यावरील दुष्काळाचे संकट टळावे, राज्यातील जनता सुखी, संपन्न राहो अशी प्रार्थना केली.… Continue reading राज्यातील जनता सुखी, संपन्न राहो; मंत्री चंद्रकांत पाटील यांची विठुराया चरणी प्रार्थना

error: Content is protected !!