राशिवडे (प्रतिनिधी) :  राधानगरी तालुक्यातील भोपळवाडी येथील सुभाष लक्ष्मण शेलार (वय ४३) हे ऊस वाहतुकीच्या निमित्ताने हुबळी धारवाड परिसरात गेले होते. यावेळी ट्रक क्र. एमएच १० झेड ४३३४ मध्ये ऊस भरून रस्त्याने जात होते.

यावेळी ट्रकमध्ये भरलेल्या ऊसाच्या वरील बाजूला विजेच्या तारा लोंबकळत होत्या. या तारा ऊसाला लागतात का, हे पाहण्यासाठी शेलार ट्रकवरती गेले असता त्यांना या वीजेच्या तारांचा जोरदार धक्का लागला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. सुभाष यांच्या अकाली मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.