कोल्हापूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव व कोल्हापूर जिल्हा सह प्रभारी रणजीत भैया देशमुख यांनी कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये भेट दिली. कोल्हापूर दौऱ्यादरम्यान त्यांनी शिरोळ, हातकणंगले, इचलकरंजी येथे भेटी दिल्या.

जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये प्रदेश सरचिटणीस गुलाबराव घोरपडे यांच्याशी तसेच तालुकाध्यक्ष यांच्याशी चर्चा करून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सूचनेनुसार राज्यभरात राबवण्यात येणाऱ्या जनजागरण अभियान संदर्भात कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जनजागरण अभियान संदर्भातील आढावा बैठक घेतली.

याप्रसंगी जिल्हा काँग्रेस सचिव संजय पवार- वाईकर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सोशल मीडियाचे कोर कमिटी सदस्य विजयानंद पोळ, सोशल मीडियाचे सरफराज, प्रताप नाईक, बाळासाहेब पाटील आदीसह जिल्ह्यातील पदाधिकारी, तालुकाध्यक्ष उपस्थित होते.