इचलकरंजीच्या पोलीस नाईकाला चार हजारांची लाच घेताना अटक…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : दाखल गुन्ह्यात मदत करण्यासाठी चार हजारांची लाच घेताना इचलकरंजीमधील शहापूर पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबलला आज (गुरुवार) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली. पांडुरंग लक्ष्मण गुरव (रा. खानापूर ता.भुदरगड, मूळ रा. पिरळ, ता.राधानगरी) असे या पोलीस कॉन्स्टेबलचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, इचलकरंजीमध्ये तक्रारदार आणि त्यांच्या आई विरुद्ध शहापूर पोलीस ठाण्यात… Continue reading इचलकरंजीच्या पोलीस नाईकाला चार हजारांची लाच घेताना अटक…

राधानगरी धरणातून पाणी वाहून गेल्याने पाणीटंचाई जाणवणार का..?  

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राधानगरी धरणाचे सर्व्हिस गेट अचानकपणे उघडून अडकल्याने बुधवारी सकाळी सव्वा नऊ वाजता भोगावती नदीच्या पात्रात सुमारे साडे सहा हजार क्युसेक विसर्ग सुरू झाला होता. धरणातून सहा तासांत तब्बल १६६ एफसीएफटी पाणी वाहून गेले आहे. त्यामुळे भविष्यात जिल्ह्याला पाणीटंचाई जाणवणार का ? असा प्रश्न सर्वांना पडला असताना पाटबंधारे विभागाने दिलासादायक माहिती दिली आहे. … Continue reading राधानगरी धरणातून पाणी वाहून गेल्याने पाणीटंचाई जाणवणार का..?  

भारतीय मराठा संघ कष्टकरी जनतेच्या पाठीमागे सदैव राहील : एस. डी. पाटील

शाहूवाडी (प्रतिनिधी) : सर्वसामान्य कष्टकरी आणि जगाचा पोशिंदा असलेला बळीराजा यांच्या हस्ते नवीन वर्षाचे दिनदर्शिका प्रकाशित करताना मनस्वी आनंद होत आहे. भारतीय मराठा संघ कष्टकरी जनतेच्या पाठीमागे सदैव राहील, असे प्रतिपादन संघाचे प्रदेश सचिव एस. डी. पाटील यांनी केले. सकल मराठा फौंडेशन प्रणित भारतीय मराठा संघाच्या वतीने नूतन वर्ष २०२२ च्या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा परळे… Continue reading भारतीय मराठा संघ कष्टकरी जनतेच्या पाठीमागे सदैव राहील : एस. डी. पाटील

भीषण अपघातात एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू

औरंगाबाद  (प्रतिनिधी) : सिल्लोड तालुक्यातील भराडी महामार्गावर झालेल्या भीषण  अपघातात एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू झाला आहे. हा अपघात आज (गुरूवार) पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास झाला. भराडी रोडवर उसाचा ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेला बंद पडल्याने उभा केला होता. यावर छोटा टेम्पो येऊन जोरात आदळला.   जिजाबाई गणपत खेळवणे ( वय ६०) संजय संपत खेळवणे ( ४२),… Continue reading भीषण अपघातात एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू

महात्मा गांधींबद्दल अपशब्द वापरल्याप्रकऱणी कालीचरण महाराजला अटक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपिता महात्मा गांधी  यांच्याबद्दल अपशब्द वापरल्या प्रकरणी कालीचरण महाराजला मध्य प्रदेशातील खजुराहो  येथील बगेश्वरी धाममधून अटक करण्यात आली. ही कारवाई छत्तीसगडच्या रायपूर पोलिसांनी आज (गुरूवार) पहाटे केली.  टिकारपारा पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बगेश्वरी धामममधून पहाटे चार वाजता कालीचरण महाराजला ताब्यात घेण्यात आले. कालीचरण महाराजला दुपारपर्यंत रायपूरला आणले… Continue reading महात्मा गांधींबद्दल अपशब्द वापरल्याप्रकऱणी कालीचरण महाराजला अटक

रांगोळीतील रस्त्याचे काम मोजणी करूनच सुरू करावे : किरण हवालदार

रांगोळी (प्रतिनिधी) : रांगोळी येथे कन्या विद्यामंदिराच्या भोवतीने दलित वस्ती सुधारयोजनेअंतर्गत ढोर वसाहत रस्त्याचे काम आहे. या  रस्त्याची आणि विद्यामंदिराच्या जागेची मोजणी करून हा रस्ता सुरू करावा. यासाठी हातकणंगलेच्या गटविकास अधिकारी डॉ. शबाना मोकाशी, ग्रामविकास अधिकारी कुमार वंजिरे आणि रांगोळी ग्रामपंचायतीला किरण हवालदार यांनी निवेदन दिले.  निवेदनात म्हटले आहे की, या रस्त्यांचे काम करत असताना… Continue reading रांगोळीतील रस्त्याचे काम मोजणी करूनच सुरू करावे : किरण हवालदार

कोल्हापूर शहरात ओमायक्रॉनचा रूग्ण सापडल्याने खळबळ  

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर शहरातील कळंबा परिसरातील एका रूग्णाला आज (बुधवारी) दुपारी ओमायक्रॉनची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे  या रूग्णाने कोठेही प्रवास केलेला  नाही. त्यामुळे आरोग्य  विभागासह प्रशासनाची चिंता वाढली आहे. रूग्ण राहत असलेला परिसर प्रतिबंधित क्षेत्र करण्यात येणार आहे. कळंबा येथील आयटीआय परिसरातील एका व्यक्तीला खासगी रुग्णालयामध्ये दाखल केले होते. त्याचा कोरोना चाचणी… Continue reading कोल्हापूर शहरात ओमायक्रॉनचा रूग्ण सापडल्याने खळबळ  

राधानगरी धरणाचा ‘तो’ दरवाजा बंद झाला…

राशिवडे (प्रतिनिधी) : राधानगरी धरणाचा सकाळी साडेनऊ वाजता उघडलेला मुख्य दरवाजा पाटबंधारे विभागाच्या तत्परतेने जवळपास सहा तासांनी बंद करण्यात आला. तो दरवाजा नेमका उघडला कसा याचं कारण अजूनही समोर आलेलं नाही. हा मुख्य दरवाजा कोणी चुकून उघडला, मुद्दामून उघडला की इलेक्ट्रिक शॉर्टसर्किटमुळे उघडला गेला याची चौकशी आता केली जाणार आहे. त्यानंतरच यामागचे मुख्य कारण समोर… Continue reading राधानगरी धरणाचा ‘तो’ दरवाजा बंद झाला…

राधानगरी धरणातील विसर्ग संध्याकाळपर्यंत बंद होईल : रोहित बांदिवडेकर

कोल्हापूर (प्रतिनिधी ) : राधानगरी धरणाचे हे गेट शॉर्ट सर्किटमुळे ओपन झाले असल्याचा पाटबंधारे विभागाच्या इलेक्ट्रिकल टीमचा प्राथमिक अंदाज आहे. हे सर्विस गेट बंद करण्यासाठी जलसंपदा विभाग व यांत्रिकी विभागाच्या टीम्स राधानगरी धरणावर पोहोचल्या आहेत. इमर्जन्सी गेट टाकून त्यानंतर सर्विस गेट बंद करण्यात येणार आहे. यासाठी साधारण ५ ते ७ तासाचा वेळ लागणार असून अंदाजे… Continue reading राधानगरी धरणातील विसर्ग संध्याकाळपर्यंत बंद होईल : रोहित बांदिवडेकर

येवती ग्रामस्थांतर्फे ‘आप’च्या संदीप देसाईंचा सत्कार  

कोल्हापूर (प्रतिनिधी) : दूधगंगा डावा कालव्याच्या बांधकामासाठी संपादित केलेल्या जमिनीच्या मोबदल्याची  फरकासह रक्कम २ कोटी ३ लाख रुपये बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहे.  याबाबत आम आदमी पक्षाच्या वतीने पाठपुरावा केला होता. त्याबद्दल येवती (ता. करवीर) येथील शेतकऱ्यांनी पश्चिम महाराष्ट्र  आम आदमी पार्टीचे  अध्यक्ष  संदीप देसाई  यांचा सत्कार केला. येवती (ता. करवीर) येथील शेतकऱ्यांना प्रशासनाने… Continue reading येवती ग्रामस्थांतर्फे ‘आप’च्या संदीप देसाईंचा सत्कार  

error: Content is protected !!