राशिवडे (प्रतिनिधी) : राधानगरी धरणाचा सकाळी साडेनऊ वाजता उघडलेला मुख्य दरवाजा पाटबंधारे विभागाच्या तत्परतेने जवळपास सहा तासांनी बंद करण्यात आला. तो दरवाजा नेमका उघडला कसा याचं कारण अजूनही समोर आलेलं नाही.

हा मुख्य दरवाजा कोणी चुकून उघडला, मुद्दामून उघडला की इलेक्ट्रिक शॉर्टसर्किटमुळे उघडला गेला याची चौकशी आता केली जाणार आहे. त्यानंतरच यामागचे मुख्य कारण समोर येईल. दरम्यान पाच हजार क्युसेक्स या हिशेबाने जवळपास १६० दशलक्ष घनफूट पाणी बाहेर पडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. धरणाची पाणी पातळी आता दुपारपर्यंत १ फुटांनी कमी झाली आहे.