रांगोळी (प्रतिनिधी) : रांगोळी येथे कन्या विद्यामंदिराच्या भोवतीने दलित वस्ती सुधारयोजनेअंतर्गत ढोर वसाहत रस्त्याचे काम आहे. या  रस्त्याची आणि विद्यामंदिराच्या जागेची मोजणी करून हा रस्ता सुरू करावा. यासाठी हातकणंगलेच्या गटविकास अधिकारी डॉ. शबाना मोकाशी, ग्रामविकास अधिकारी कुमार वंजिरे आणि रांगोळी ग्रामपंचायतीला किरण हवालदार यांनी निवेदन दिले. 

निवेदनात म्हटले आहे की, या रस्त्यांचे काम करत असताना विद्यामंदिर येथील शौचालय आणि मुतारीची सांडपाणी व्यवस्था केली नाही. त्यामुळे परिसरात दुर्गंधी निर्माण होण्याची शक्यता आहे. सांडपाण्याची व्यवस्था करूनच या रस्त्याची मोजणी करून पुढील काम सुरू करावे. तोपर्यंत रस्त्याचे काम चालू करु नये असे म्हटले आहे. याबाबत गटविकास अधिकाऱ्यांनी या रस्त्याची मोजणी करूनच काम सुरु करण्याचे आश्वासन दिले. तसेच रस्त्याच्या कॉन्ट्रॅक्टदारांना रस्त्याचे काम थांबवणेबाबत सूचना दिल्या.