शाहूवाडी (प्रतिनिधी) : सर्वसामान्य कष्टकरी आणि जगाचा पोशिंदा असलेला बळीराजा यांच्या हस्ते नवीन वर्षाचे दिनदर्शिका प्रकाशित करताना मनस्वी आनंद होत आहे. भारतीय मराठा संघ कष्टकरी जनतेच्या पाठीमागे सदैव राहील, असे प्रतिपादन संघाचे प्रदेश सचिव एस. डी. पाटील यांनी केले.

सकल मराठा फौंडेशन प्रणित भारतीय मराठा संघाच्या वतीने नूतन वर्ष २०२२ च्या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा परळे (ता. शाहूवाडी) येथील ऊसतोड शेतकरी यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते.

पाटील म्हणाले की, भारतीय मराठा संघ हा नेहमीच अन्यायाविरुद्ध रस्त्यावर उतरत असतो. सर्वसामान्य मराठी बांधवांच्या न्याय हक्कासाठी यापुढेही अविरतपणे मराठा संघाचे कार्य चालू राहणारच आहे.

संस्थापक अध्यक्ष अविनाश पवार म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वांना बरोबर घेऊन स्वराज्य निर्माण केले. त्या पद्धतीनेच जात-पात-धर्म न मानता मराठा महासंघाचे कार्य यापुढेही असेच सुरू राहणार आहे.

किशोर पाटील म्हणाले की, खऱ्या अर्थाने आज आम्हाला एक वेगळा दिवस साजरा केला असल्याचे समाधान मिळाले. ऊसतोड करत असताना आमच्या हस्ते प्रकाशन करून शेतकरी बांधवांना भारतीय मराठा संघाने दिलेला हा सन्मान कौतुकास्पद आहे.

यावेळी रमेश जामदार, संदीप पाटील, अरविंद पाटील आदीसह महिला व शेतकरी बांधव उपस्थित होते.