नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रपिता महात्मा गांधी  यांच्याबद्दल अपशब्द वापरल्या प्रकरणी कालीचरण महाराजला मध्य प्रदेशातील खजुराहो  येथील बगेश्वरी धाममधून अटक करण्यात आली. ही कारवाई छत्तीसगडच्या रायपूर पोलिसांनी आज (गुरूवार) पहाटे केली.  टिकारपारा पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बगेश्वरी धामममधून पहाटे चार वाजता कालीचरण महाराजला ताब्यात घेण्यात आले. कालीचरण महाराजला दुपारपर्यंत रायपूरला आणले जाणार आहे.

कालीचरण महाराजने धर्मसंसदेत केलेल्या भाषणादरम्यान राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल अपशब्द वापरले होते. त्यानंतर मोठा गदारोळ  माजला होता. कालीचरण महाराजच्या अटकेच्या मागणी  केली जात  होती. तर  काही ठिकाणी गुन्हे दाखल केले होते. रायपूर पोलिसांची दोन पथके महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशात कालीचरण महाराजच्या  शोधासाठी पाठवली होती.