कुरुंदवाड नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण शिबिर 

कुरुंदवाड (प्रतिनिधी) : कुरुंदवाड पालिकेत स्वच्छ सर्वेक्षण २०२२ व माझी वसुंधरा अभियानांतर्गत कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. शिबिराचे उदघाटन प्रशासक मुख्याधिकारी निखिल जाधव यांच्या हस्ते  झाले. यावेळी कर्तव्य बजावत असताना घ्यावयाची काळजी तसेच काम करीत असताना सुरक्षिततेसाठी वापरावयाची साधने याबाबत प्रबोधन करण्यात आले. तसेच आरोग्य विभागाकडील कर्मचाऱ्यांना पीपीई किटचे वाटप करण्यात आले. अभियानामध्ये उत्कृष्ठ कामगिरी… Continue reading कुरुंदवाड नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण शिबिर 

कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून कडक निर्बंध लागू : जिल्हाधिकारी  

कोल्हापूर (प्रतिनिधी) : ओमायक्रॉन विषाणूचा प्रसार झपाट्याने वाढत  आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात  आज (शुक्रवार)) रात्री १२ वाजल्यापासून कडक निर्बंध लागू केले आहेत. याबाबतच्या सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष राहुल रेखावार यांनी दिल्या आहेत. लागू केलेले निर्बंध खालीलप्रमाणे :- – विवाह समारंभासाठी बंदिस्त किंवा खुल्या जागेत, जास्तीत जास्त ५० व्यक्तींनाच उपस्थित राहण्यास… Continue reading कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून कडक निर्बंध लागू : जिल्हाधिकारी  

फुटवेअर, कापड्यांबाबत जीएसटी परिषदेचा मोठा निर्णय

नवी दिल्ली  (वृत्तसंस्था) : फुटवेअर आणि कापड्यांचे दर वाढवण्यावर तूर्तास स्थगिती दिल्याने दर कायम राहिले आहेत.  तर वाढलेले दर तूर्तास थांबविण्याचा निर्णय आज (शुक्रवार) झालेल्या जीएसटी  परिषदेत घेण्यात आला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली  झालेल्या बैठकीत काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. जीएसटी मध्ये ५, १२, १८ आणि २८ टक्के असे स्लॅब आहेत. ज्या वस्तूंवर… Continue reading फुटवेअर, कापड्यांबाबत जीएसटी परिषदेचा मोठा निर्णय

पोलीस निरीक्षक शिल्पा चव्हाण यांची आत्महत्या

पुणे  (प्रतिनिधी) : वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिल्पा चव्हाण यांनी  आत्महत्या केल्याने पुणे शहर पोलीस दलात  खळबळ उडाली आहे.  चव्हाण यांनी विश्रांतवाडी येथील शांतीनगर परिसरातील राहत्या घरी ओढणीने गळफास घेतला. हा प्रकार आज (शुक्रवार) दुपारी दीडच्या सुमारास समोर आला. आत्महत्त्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. गुन्हे शाखेतील सामाजिक सुरक्षा विभागात कार्यरत  असणाऱ्या चव्हाण यांनी भरोसा… Continue reading पोलीस निरीक्षक शिल्पा चव्हाण यांची आत्महत्या

कुरुंदवाड नगरपरिषदेवर प्रशासकाची नियुक्ती

कुरुंदवाड (प्रतिनिधी) :  कुरुंदवाडच्या नगराध्यक्ष,  नगरसेवकांचा पाच वर्षाचा कार्यकाळ गुरुवारी संपुष्टात आला. त्यामुळे आजपासून (शुक्रवार)  प्रशासकराज सुरु झाले असून मुख्याधिकारी निखिल जाधव यांची प्रशासक म्हणून नियुक्ती झाली आहे.  तर पुढील नवनिर्वाचीत पदाधिकाऱ्यांची पहिली बैठक होईपर्यत प्रशासक  कारभार पाहतील. डिसेंबरअखेर पंचवार्षिक कार्यकाळ संपुष्टात येत असल्याने प्रभाग रचनेचा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. मात्र, ओबीसी आरक्षणाशिवाय कोणत्याही… Continue reading कुरुंदवाड नगरपरिषदेवर प्रशासकाची नियुक्ती

नवीन वर्षात ‘गोकुळ’ २० लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा पूर्ण करेल : विश्वास पाटील  

कोल्‍हापूर  (प्रतिनिधी) :  गोकुळ ने नजीकच्या काळात वीस लाख लिटर दूध संकलनाचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यासाठी नियोजन केले आहे. सध्या गोकुळचे दूध संकलन सतरा लाख लिटरपर्यंत पोहोचले आहे. गेल्या सहा महिन्याच्या कालावधीत दूध संकलनात प्रतिदिन सरासरी तीन लाख लिटर दुधाची भर पडली आहे. या दुधामध्ये म्हैस दुधातील वाढ  दिलासादायक आहे. याचे सर्व श्रेय संघाचे दूध… Continue reading नवीन वर्षात ‘गोकुळ’ २० लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा पूर्ण करेल : विश्वास पाटील  

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर भाजपचा झेंडा : महाविकास आघाडीला धक्का   

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीची  आज मतमोजणी होत आहे. भाजपप्रणित सिद्धिविनायक सहकार पॅनलने १० जागा जिंकल्या आहेत. तर महाविकास आघाडीच्या सहकार समृद्धी पॅनलला ७ जागा मिळालेल्या आहेत. या निकालामुळे जिल्ह्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुन्हा एकदा वर्चस्व निर्माण झाले आहे. सहकारी संस्था, नागरी पतपुरवठा संस्था, पगारदार नोकरांच्या संस्था मतदारसंघात भाजपाचे… Continue reading सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर भाजपचा झेंडा : महाविकास आघाडीला धक्का   

हुपरी येथे दोन गटात हाणामारी : ११ जण जखमी

रांगोळी (प्रतिनिधी) : हुपरी येथील चर्मकार समाजाच्या दोन गटात  अतिक्रमण होत असल्याच्या कारणावरून जोरदार मारामारी, शिवीगाळ व  दगडफेकीची घटना गुरूवारी रात्री उशीरा झाली. यात ११ जण जखमी झाले आहेत. गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी ८० जणांवर गुन्हा दाखल केला असून गावात  मोठा  पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यासंदर्भात राजाराम बाळू शिराळे… Continue reading हुपरी येथे दोन गटात हाणामारी : ११ जण जखमी

कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन दिवसात जनावरांच्या चोरीच्या घटना…

कुरुंदवाड (प्रतिनिधी) : कुरुंदवाड पोलीस ठाणे परिसरात दोन वेगळ्या ठिकाणी पाळीव जनावरे चोरीच्या घटना घडल्या आहेत. शिरोळ तालुक्यातील सैनिक टाकळी येथील शेतात खतासाठी बसवण्यात आलेल्या २० मेंढ्या अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या आहेत. याची फिर्याद युवराज महादेव येडके (रा. सैनिक टाकळी) यांनी पोलिसांमध्ये दिली आहे. सैनिक टाकळी येथील सुरेश हाके आणि विनोद यंकापगोळ यांच्या मालकीच्या मेंढ्या… Continue reading कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन दिवसात जनावरांच्या चोरीच्या घटना…

कुरुंदवाड नगरपालिकेत नगराध्यक्ष, नगरसेवकांना निरोप

कुरुंदवाड(प्रतिनिधी): कुरुंदवाड नगरपालिका सभागृहाची मुदत संपल्याने पाणीपुरवठा अभियंता प्रदीप बोरगे यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नगराध्यक्ष, नगरसेवकांना पुष्पगुच्छ देऊन निरोप दिला. नगराध्यक्ष जयराम पाटील व नगरसेवकांनी ५ वर्षाच्या काळात शहराचा पुरेपूर विकास साधण्याचा प्रयत्न केला. यासाठी सर्वांचे उत्तम सहकार्य लाभल्याचे सांगत आभार मानले. बहुतांश नगरसेवकांनी पालिकेत पुन्हा येईनचा नारा यावेळी दिला. नगराध्यक्ष, नगरसेवकांचा कार्यकाळ बुधवारी समाप्त… Continue reading कुरुंदवाड नगरपालिकेत नगराध्यक्ष, नगरसेवकांना निरोप

error: Content is protected !!