पंढरपूर प्रतिनिधी-

केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय कुमार मिश्रा  यांनी आज श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने मंदीर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाढ  यांच्याहस्ते शाल व श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देवून सत्कार करण्यात आला.

यावेळी  आमदार समाधान आवताडे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी मंत्री बाळासाहेब भेगडे, माजी आमदार प्रशांत परिचारक, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, तहसिलदार सुशिल बेल्हेकर, पोलीस निरिक्षक अरुण फुगे  यांच्यासह मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.