पंढरपूर प्रतिनिधी

सौ विदुला विनय काळे यांचे स्मरणार्थ पुणे येथील काळे-कर्वे असोसिएट्स यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीस ८ लाख ४५ हजार ३५० रुपये देणगी दिली.

यावेळी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने समितीचे कार्यकारी अधिकारी तुषार ठोंबरे व मंदीर समितीच्या सदस्य विधीज्ञा माधवी निगडे यांच्या हस्ते काळे-कर्वे असोसिएट्सचे सदस्याचा सत्कार श्री ची प्रतिमा, उपरणे, श्रीफळ देऊन करण्यात आला. यावेळी समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड व मंदीर समितीचे कर्मचारी उपस्थित होते.