पंढरपूर प्रतिनिधी

नवीन वर्षाच्या सुरवातीलाच मोहाली येथील मे युनिव्हर्सल ग्रुप प्रोडक्शन हाऊसचे प्रकाशसिंग गिल यांनी विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीस २१ लाख रुपयाची देणगी धनादेश स्वरूपात दिली.

यावेळी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदीरे समितीचे वतीने मंदिर समितीचे सदस्य संभाजीराजे शिंदे यांच्या हस्ते प्रकाशसिंग गिल यांचा सत्कार “श्री” ची प्रतिमा, उपरणे, श्रीफळ देऊन करण्यात आला. यावेळी मंदिरे समितीचे कर्मचारी उपस्थित होते.