मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात आता सर्वच ठिकाणी कडक उन्हाळा जाणवत असून काही भागांमध्ये ढगाळ वातावरणासह पाऊसही पडतोय. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पाऊस आणि उष्णतेची लाट दिसून येतेय. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आणखी काही दिवस अशीच स्थिती राहणार आहे. पुढील ७ दिवस राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, किनारपट्टीवरील शहरं वगळता राज्यातील बहुतांश भागात गडगडाटी वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता आहे. सिंधुदूर्ग, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापर, नगर, धाराशिव, लातूर, बीड, नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.