युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांच्या हस्ते शहरातील विविध विकासकामांचा शुभारंभ…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर शहरातील सर्व वॉर्डामध्ये अंतर्गत रस्ते आणि ड्रेनेज लाईनची पायाभूत सुविधा निर्माण करून नागरिकांना सुविधा देण्यासाठी युथ आयकॉन कृष्णराज महाडिक प्रयत्नशिल आहेत. त्यासाठी खासदार धनंजय महाडिक यांच्या माध्यमातून २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.या निधीतून विविध प्रभागातील कामे करण्यात येत आहेत. यातंर्गत कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ८ भोसलेवाडी कदमवाडीमध्ये रस्ता डांबरीकरणाचे… Continue reading युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांच्या हस्ते शहरातील विविध विकासकामांचा शुभारंभ…

खरा चेहरा जनतेसमोर आणण्याचे काम पत्रकार करतो : आ. सदाभाऊ खोत

कळे (प्रतिनिधी) : आजकाल चांगल्या माणसांना राजकारण मारक आहे. पत्रकाराने त्यांना जगवले पाहिजे तरच ते बदल घडवू शकतात. प्रतिमांच्या मेकअपचे थर खरवडून खरा चेहरा लोकांच्या पुढे आणण्याचे काम पत्रकार करत असतो.असे प्रतिपादन आमदार सदाभाऊ खोत यांनी केले. ते पन्हाळा तालुक्यातील कळे येथे पत्रकार दिनानिमित्त पश्चिम पन्हाळा ग्रामीण पत्रकार संघ आयोजित पुरस्कार वितरण कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानी कळेचे… Continue reading खरा चेहरा जनतेसमोर आणण्याचे काम पत्रकार करतो : आ. सदाभाऊ खोत

संजीवनच्या विद्यार्थ्यांनी स्वतःमधील सामर्थ्य ओळखावे : प्रा. नितीन बानगुडे पाटील

पन्हाळा (प्रतिनिधी) : संजीवनच्या विद्यार्थ्यांनी स्वतः मधील सामर्थ्य ओळखावे,छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये स्वकर्तुत्वाने स्वतःचे जीवन घडवावे.असे मत संजीवन ज्ञानासमूहाच्या वार्षिक पारितोषिक वितरण सोहळ्यावेळी प्रा. नितीन बानगुडे पाटील यांनी व्यक्त केले. यावेळी प्रथम क्रमांक आलेल्या गुणवंत विद्यार्थी तसेच कला,क्रीडा,वक्तृत्व,नाट्य-अभिनय अशा विविध स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थी विद्यार्थिनींना आणि गुरुजनांना पारितोषिके देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. यासंदर्भात… Continue reading संजीवनच्या विद्यार्थ्यांनी स्वतःमधील सामर्थ्य ओळखावे : प्रा. नितीन बानगुडे पाटील

टोपच्या आठवडी बाजारात चोरांचा सुळसुळाट : प्रशासनाचे दुर्लक्ष

टोप (प्रतिनिधी) : टोप गावात दर गुरुवारी आठवडी बाजार भरत असतो. यावेळी अनेकांचे मोबाईल चोरीला जाण्याचे प्रकार होत आहेत. आज टोप ग्रामपंचायत समोरील बोगद्यात गावातील एका महिलेच्या गळ्यातील दागिने हिसडा मारून चोरण्याचा प्रयत्न झाला.पण गळ्यातील मौल्यवान वस्तू तिथेच पडली. यावेळी महिलेने आरडाओरडा सुरू केल्याने चोराने तिथून धूम ठोकली. यावेळी त्या महिलेच्या गळ्याला चोराची नक्खे लागलयाने… Continue reading टोपच्या आठवडी बाजारात चोरांचा सुळसुळाट : प्रशासनाचे दुर्लक्ष

जोतिबा रस्त्यावर खडीचे मोठे ढिग रस्त्यावर : मोटरसायकलस्वार जखमी

टोप (प्रतिनिधी) :  हातकणंगले तालुक्यातील टोप येथे जोतिबाकडे जाणाऱ्या रस्त्यावर नारायण टेक दरम्यान रस्ता दुरुस्तीसाठी ठेकेदाराने रस्त्यावर मधोमध खडीचे टाकलेल्या ढिगाऱ्यावरून पडून मोटारसायकलस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना काल (बुधवार) रात्री उशिरा घडली आहे. या रस्त्यावर खड्डेच खड्डे असून याच्या दुरुस्तीचे काम आजच सुरू झाले आहे. या कामासाठी ठेकेदाराने रस्त्यात टाकलेल्या खडीचे ढीग लक्षात न आल्याने… Continue reading जोतिबा रस्त्यावर खडीचे मोठे ढिग रस्त्यावर : मोटरसायकलस्वार जखमी

रोटरी क्लबच्या वतीने पद्मश्री मुरलीकांत पेटकरांच्या उपस्थित सभेचे आयोजन…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनची 28 वी सभा 11 जानेवारीला सायंकाळी पाच वाजता वृषाली हॉटेलमध्ये होणार आहे. या सभेसाठी पद्मश्री मुरलीकांत राजाराम पेटकर हे पुण्याहून उपस्थित राहणार आहेत. पेटकर हे सैन्य दलात कार्यरत असताना युध्दामध्ये त्यांना अपंगत्व आलं. मात्र, त्यावर मात करून दिव्यांगांसाठी झालेल्या पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत त्यांनी देशाला पहिलं सुवर्णपदक मिळवून… Continue reading रोटरी क्लबच्या वतीने पद्मश्री मुरलीकांत पेटकरांच्या उपस्थित सभेचे आयोजन…

छत्रपती ग्रुपचे इचलकरंजी उपायुक्तांना निवेदन..!

कोल्हापूर (प्रतिनिधी) : छत्रपती ग्रुप महाराष्ट्र राज्यच्या वतीने इचलकरंजी शहरातील प्रभाग क्र. १९ सुतार मळा येथे नागरिकांच्या आरोग्यास हानिकारक ठरणाऱ्या नाले गटारी तुंबल्या आहेत. तेथील नागरी सूव्यवस्थेबाबत नगरपालिका प्रशासन दुर्लक्ष करीत आहेत. यासाठी छत्रपती ग्रुप, इचलकरंजी शहर प्रमुख विकास जावळे यांनी ८ जानेवारी रोजी इचलकरंजी नगरपालिका उपायुक्त स्मिता पाटील यांना ही बाब लक्षात आणून देऊन… Continue reading छत्रपती ग्रुपचे इचलकरंजी उपायुक्तांना निवेदन..!

हेरवाड–सलगरे रस्त्याबाबत छत्रपती ग्रुपचे सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन..!  

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातून कर्नाटकला जोडणारा मार्ग म्हणजे हेरवाड ते सलगरे मार्ग आहे आणि हा एकमेव मार्ग सुस्थितीत आहे. मात्र, गेल्या महिनाभरात दोघांचा अपघाती मृत्यू तर १५ जण गंभीर जखमी झाले आहेत. हा मार्ग सुस्थितीत असल्याने महाराष्ट्र-कर्नाटक भागातून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांची पहिली पसंती याच मार्गाला आहे. मात्र, वेगमर्यदेपेक्षा अती वेगाने वाहन चालणाऱ्यांची संख्या बळावताना दिसत… Continue reading हेरवाड–सलगरे रस्त्याबाबत छत्रपती ग्रुपचे सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन..!  

पत्रकारांच्या सहकार्याने शिरोळातील एकेरी वाहतुकीचा प्रश्न मार्गी लावू : पृथ्वीराजसिंह यादव

शिरोळ (प्रतिनिधी) : शिरोळ तालुक्यातील सर्वच पत्रकारांनी सामाजिक भान जपत आपली पत्रकारिता सुरू ठेवली आहे. यामुळे समाजातील अनेक प्रश्न सुटले आहेत. पत्रकारांच्या सहकार्याने शिरोळातील एकेरी वाहतुकीचा प्रश्न लवकरच मार्गी लावू असा विश्वास पृथ्वीराजसिंह यादव यांनी व्यक्त केला. ते यादव प्रेमी ग्रुपच्या वतीने आयोजित केलेल्या पत्रकारांच्या सत्कार सोहळ्यामध्ये बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्स्थानी पत्रकार सुनील इनामदार होते.… Continue reading पत्रकारांच्या सहकार्याने शिरोळातील एकेरी वाहतुकीचा प्रश्न मार्गी लावू : पृथ्वीराजसिंह यादव

संगीतसूर्य केशवराव भोसले यांचे नातू मोहनराव शिंदे यांचे निधन…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : संगीतसूर्य केशवराव भोसले यांचे नातू आणि निवृत्त कमिशनर मोहनराव शिंदे यांचे आज (रविवार) सकाळी वयाच्या 90 व्या वर्षी वृध्दापकाळाने निधन झाले. ते कोल्हापूरातील अंबाई डिफेन्स कॉलनीमध्ये राहत होते. बेलबाग परिसरात क्लिनिक असणाऱ्या डॉ. श्रीकांत शिंदे यांचे ते वडिल होते. केशवराव भोसले नाट्यगृहाचे नामकरण संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह असे व्हावे. नाट्यगृहाच्या आवारात संगीत… Continue reading संगीतसूर्य केशवराव भोसले यांचे नातू मोहनराव शिंदे यांचे निधन…

error: Content is protected !!