सर्व समाज घटकांना न्याय देण्याचा संकल्प असलेले काँग्रेसचे ‘न्यायपत्र’: नाना पटोले

अग्निपथ योजना रद्द करणार, आरक्षणाची ५० टक्के मर्यादा हटवणार; कॉंग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध मुंबई/प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. या जाहीरनाम्याची मध्यवर्ती संकल्पना न्याय ही आहे. मागील १० वर्षांत प्रत्येक घटकाचा न्याय धोक्यात आला आहे, कमकुवत झाला आहे तर काही बाबतीत न्याय नाकारलाही आहे. म्हणूनच काँग्रेस पक्षाने पाच न्याय… Continue reading सर्व समाज घटकांना न्याय देण्याचा संकल्प असलेले काँग्रेसचे ‘न्यायपत्र’: नाना पटोले

नवनीत राणांना मोठा दिलासा; जात प्रमाणपत्र वैध : सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

नवी दिल्ली : नवनीत राणा यांना जात प्रमाणपत्र प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. नवनीत रण यांच्या जात प्रमाणपत्र आज सुनावणी पार पडली. यावेळी न्यायमूर्ती जे. के. महेश्वरी आणि संजय करोल यांच्या खंडपीठानं नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र वैध असल्याचा निर्णय दिला. त्यामुळे नवनीत राणा यांना मोठा दिलासा मानला जात असून त्यांना लोकसभा निवडणुकीचा… Continue reading नवनीत राणांना मोठा दिलासा; जात प्रमाणपत्र वैध : सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

मद्य घोटाळा प्रकरण : आप खासदार संजय सिंह यांना जामीन

दिल्ली/वृत्तसंस्था : दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणी आपला मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, ‘आप’चे खासदार संजय सिंह यांच्या अटकेवरील आव्हानाच्या याचिकेवर कोर्टात सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टात झालेल्या या सुनावणीत आप खासदार संजय सिंह यांना जामीन मिळाला आहे. ते मागील सहा महिन्यांपासून अटकेत होते. तर संजय सिंह यांना दिलेली सूट इतर सर्व प्रकरणांमध्ये उदाहरण म्हणून… Continue reading मद्य घोटाळा प्रकरण : आप खासदार संजय सिंह यांना जामीन

परस्पर संमतीने विवाहबाह्य संबंध गुन्हा नाही : राजस्थान उच्च न्यायालयाचा निर्णय

राजस्थान : दोन सज्ञान जोडप्यामध्ये परस्पर संमतीने जर शारिरिक संबंध प्रस्तापित होत असतील तर हा कायदेशीर गुन्हा नाही असा महत्वपूर्ण निर्णय राजस्थान उच्च न्यायालयाने दिला आहे. राजस्थान उच्च न्यायालयाने लैगिंक संबंधा संदर्भात हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. न्यायमूर्ती बिरेंद्र कुमार यांच्या खंडपीठाने सांगितले की, जेव्हा दोन प्रौढ विवाहबाह्य संमतीने लैंगिक संबंध ठेवतात. तेव्हा तो कायदेशीर… Continue reading परस्पर संमतीने विवाहबाह्य संबंध गुन्हा नाही : राजस्थान उच्च न्यायालयाचा निर्णय

CAA कायद्याबद्दल जनजागृती करा; चंद्रकांत पाटील यांनी केले आवाहन

पुणे ( प्रतिनिधी ) भाजप पुणे शहर अल्पसंख्याक आघाडीची बैठक उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शहर कार्यालयात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारने आणलेला नागरिकत्व सुधारणा कायदा पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान आदी देशांतून भारतात आलेल्या निर्वासित अशा सहा धर्मियांना नागरिकत्व देणारा आहे. हा कायदा कोणाचेही नागरिकत्व काढून घेणार नाही.… Continue reading CAA कायद्याबद्दल जनजागृती करा; चंद्रकांत पाटील यांनी केले आवाहन

लक्षद्वीपमध्ये ‘घड्याळ’ चिन्हावरच लढणार ; आनंद परांजपे

मुंबई/प्रतिनिधी: लक्षद्वीप येथे लोकसभेसाठी आमच्या उमेदवारांना ‘घड्याळ’ हेच चिन्ह मिळणार आहे त्यामुळे कुणीही चुकीच्या माहितीवर आधारीत गैरसमज पसरवू नये अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते आणि ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी माध्यमांशी बोलताना केली आहे. दरम्यान, टप्प्यात आल्यावर करेक्ट कार्यक्रम करायचा असतो असे शरदचंद्र पवार गटाचे ज्येष्ठ नेते बोलतात पण खोडसाळपणे चुकीच्या माहितीवर कार्यक्रम करायला… Continue reading लक्षद्वीपमध्ये ‘घड्याळ’ चिन्हावरच लढणार ; आनंद परांजपे

वकिलाला अडकवायला निघालेल्या माजी IPS अधिकाऱ्याला 20 वर्षे कारावास

सुरत ( वृत्तसंस्था ) गुजरातचे माजी आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांना अंमली पदार्थांची लागवड तसेच वकीलाला फसवल्या प्रकरणी 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. एक दिवसापूर्वीच न्यायालयाने त्यांना या प्रकरणात दोषी घोषित केले होते. न्यायालयाने गुरुवारी ही शिक्षा जाहीर केली. गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यातील पालनपूर शहरातील एका सत्र न्यायालयाने बुधवारी माजी भारतीय पोलीस सेवा (आयपीएस)… Continue reading वकिलाला अडकवायला निघालेल्या माजी IPS अधिकाऱ्याला 20 वर्षे कारावास

पीलीभीतमध्ये वरूण गांधींचे तिकीट कापले ; कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार का ?

पीलीभीत : उत्तर प्रदेशमध्ये सध्या भाजप खासदार वरुण गांधी चर्चेत आहेत. पीलीभीत लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून वरूण गांधींचे तिकीट कापून जितीन प्रसाद यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवल आहे. पीलीभीत मतदारसंघातून वरुण गांधी निवडून आले होते. त्यामुळे ही जागा पुन्हा त्यांना मिळेल, असा विश्वास त्यांना होता. पण आता त्यांना तिकीट न मिळाल्याने वरुण गांधी यांचे पुढचे पाऊल काय… Continue reading पीलीभीतमध्ये वरूण गांधींचे तिकीट कापले ; कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार का ?

‘या’ फार्मा कंपन्या ठरल्या औषध चाचणीत फेल; राजकीय पक्षांना दिले करोडोचे Electoral Bond

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) देशात अशा अनेक औषधी कंपन्या आहेत ज्यांची औषधे चाचण्यांमध्ये अपयशी ठरत आहेत. परंतु या कंपन्यांनी कोट्यवधी रुपयांचे इलेक्टोरल बाँड्स विकत घेतले आणि त्यांची औषधे औषध चाचणीत अपयशी ठरल्यावर राजकीय पक्षांना दान केली. इलेक्टोरल बाँड्सशी संबंधित डेटाचे विश्लेषण केल्यानंतर अशा गोष्टी समोर येत आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर स्टेट बँक ऑफ इंडियाने… Continue reading ‘या’ फार्मा कंपन्या ठरल्या औषध चाचणीत फेल; राजकीय पक्षांना दिले करोडोचे Electoral Bond

धक्कादायक..! ऑनलाइन क्रिकेट सट्टेबाजीत अभियंता दीड कोटी हारला; पत्नीने केली आत्महत्या

कर्नाटक ( वृत्तसंस्था ) ऑनलाइन क्रिकेट सट्टेबाजीत दीड कोटी रुपये गमावल्यानंतर एका अभियंत्याच्या पत्नीने आत्महत्या केली असून तिच्या सुसाईड नोटमध्ये पतीने ज्या लोकांकडून छळाचे पैसे घेतले होते, असा आरोप केला आहे. आता सुसाईड नोटच्या आधारे पोलिसांनी 13 जणांविरुद्ध कलम 306 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 13 पैकी तीन जणांना अटकही करण्यात आली आहे. हे प्रकरण… Continue reading धक्कादायक..! ऑनलाइन क्रिकेट सट्टेबाजीत अभियंता दीड कोटी हारला; पत्नीने केली आत्महत्या

error: Content is protected !!