राजस्थान : दोन सज्ञान जोडप्यामध्ये परस्पर संमतीने जर शारिरिक संबंध प्रस्तापित होत असतील तर हा कायदेशीर गुन्हा नाही असा महत्वपूर्ण निर्णय राजस्थान उच्च न्यायालयाने दिला आहे. राजस्थान उच्च न्यायालयाने लैगिंक संबंधा संदर्भात हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. न्यायमूर्ती बिरेंद्र कुमार यांच्या खंडपीठाने सांगितले की, जेव्हा दोन प्रौढ विवाहबाह्य संमतीने लैंगिक संबंध ठेवतात. तेव्हा तो कायदेशीर गुन्हा नाही.

पत्नीचे अपहरण केल्याचा आरोप करणाऱ्या एका व्यक्तीच्या याचिकेवर सुनावणी सुरू असतानाच हा महत्वपूर्ण निर्णय राजस्थान उच्च न्यायालयाने दिला आहे. संबंधित महिला स्वत:हून न्यायालयात हजर राहिल्यानंतर अपहरण झाले नसल्याची माहिती तिने दिली. या माहितीनंतर संबंधित महिलेने एका आरोपीसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याचे सांगितले. या प्रकरणाची सुनावणी चालू असताना याचिकाकर्त्याच्या वकिलाने युक्तिवाद केला की, महिलेने आपले विवाहबाह्य संबंध असल्याची कबुली दिली आहे, त्यामुळे हा आयपीसी कलम 494 आणि 497 अंतर्गत गुन्हा असल्याचे सांगण्यात आले.