पुणे ( प्रतिनिधी ) भाजप पुणे शहर अल्पसंख्याक आघाडीची बैठक उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शहर कार्यालयात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारने आणलेला नागरिकत्व सुधारणा कायदा पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान आदी देशांतून भारतात आलेल्या निर्वासित अशा सहा धर्मियांना नागरिकत्व देणारा आहे.

हा कायदा कोणाचेही नागरिकत्व काढून घेणार नाही. त्यामुळे नागरिकत्व सुधारणा कायदा अर्थात सीएएबद्दल जनजागृती करावी, असे आवाहन या वेळी पाटील यांनी केले. या बैठकीस शहराध्यक्ष धीरज घाटे, भाजपा पुणे शहर लोकसभा समन्वयक श्रीनाथ भिमाले, शहराचे सरचिटणीस पुनीत जोशी, राघवेंद्र मानकर, रवी साळेगावकर

अल्पसंख्याक आघाडीचे इम्तियाज मोमीन, माजी अध्यक्ष रफीक शेख, डॉ. गणेश परदेशी यांच्यासह ज्येष्ठ नेते नईम शेख, इम्रान मुजावर, समीर पठाण, तजमुल पठाण, अल्पेश घोगरी, अमित शहा, नम्रता गौड यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.