नवी दिल्ली : नवनीत राणा यांना जात प्रमाणपत्र प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. नवनीत रण यांच्या जात प्रमाणपत्र आज सुनावणी पार पडली. यावेळी न्यायमूर्ती जे. के. महेश्वरी आणि संजय करोल यांच्या खंडपीठानं नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र वैध असल्याचा निर्णय दिला. त्यामुळे नवनीत राणा यांना मोठा दिलासा मानला जात असून त्यांना लोकसभा निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.

दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयानं नवनीत राणांचं जात प्रमाणपत्र बनावट असल्याचा निर्णय दिला होता. यानंतर नवनीत राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. आज यावर सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयानं उच्च न्यायालयाचा निर्णय बदलला आणि नवनीत राणांचं जात प्रमाणपत्र वैध ठरवलं आहे.

दरम्यान, गेल्या काही वर्षांपासून या प्रकरणी वेगवेगळ्या न्यायालयांत सुनावणी चालू होती. मात्र आता ही सुनावणी पूर्ण झाली असून सर्वोच्च न्यायालयानं आज (4 एप्रिल) आपला निर्णय जाहीर केला आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र 2021 मध्ये अवैध ठरवले होते. त्यानंतर नवनीत राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयानं उच्च न्यायालयाच्या निकालाला स्थगिती दिली होती. तसेच, बोगस जात प्रमाणपत्र पडताळणी प्रकरणाचा दोनही गटाचा युक्तीवाद 28 फेब्रुवारीला पूर्ण झाला. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयानं याप्रकरणाचा निकाल राखून ठेवला. आज याप्रकरणी अंतिम निकाल जाहीर केला.
उच्च न्यायालयानं जात प्रमाणपत्र ठरवलेलं होतं अवैध
आज सर्वोच्च न्यायालयात नवनीत राणा जात प्रमाणपत्र प्रकरणाचं निकाल वाचन केलं जाणार आहे. मुंबई उच्च न्यायालयानं नवनीत राणांचं जात प्रमाणपत्र बनावट असल्याचा निर्णय दिला होता. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात नवनीत राणांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. नवनीत राणा यांच्या वडिलांनी दबाव टाकून बोगस शाळा सोडल्याचा दाखला जात प्रमाणपत्रासाठी दिल्याचे सिद्ध झालं होतं. त्यानंतर उच्च न्यायालयातील अनेक तारखांना नवनीत राणा आणि त्यांचे वडिल गैरहजर राहिले होते.