सुरत ( वृत्तसंस्था ) गुजरातचे माजी आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांना अंमली पदार्थांची लागवड तसेच वकीलाला फसवल्या प्रकरणी 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. एक दिवसापूर्वीच न्यायालयाने त्यांना या प्रकरणात दोषी घोषित केले होते. न्यायालयाने गुरुवारी ही शिक्षा जाहीर केली.

गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यातील पालनपूर शहरातील एका सत्र न्यायालयाने बुधवारी माजी भारतीय पोलीस सेवा (आयपीएस) अधिकारी संजीव भट्ट यांना 1996 च्या ड्रग्स प्रकरणात दोषी ठरवले. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश जेएन ठक्कर यांनी भट्ट यांना राजस्थानमधील वकिलाला खोट्या गुन्ह्यात अडकवल्याप्रकरणी दोषी ठरवले. त्यावेळी भट्ट जिल्ह्यात एसपी म्हणून तैनात होते.

त्यानंतर पोलिसांनी राजस्थानचे वकील सुमेरसिंग राजपुरोहित यांना 1996 मध्ये एनडीएस कायद्यांतर्गत अटक केली. पालनपूर येथील एका हॉटेलमधील वकिलाच्या खोलीतून अमली पदार्थ जप्त करण्यात आले असल्याचा दावा पोलिसांनी केला होता. राजस्थान पोलिसांनी मात्र नंतर सांगितले की, बनासकांठा पोलिसांनी राजपुरोहितला राजस्थानातील पाली येथे असलेल्या वादग्रस्त मालमत्तेचे हस्तांतरण करण्यासाठी दबाव आणण्यासाठी खोटे ठरवले होते. न्यायालयाने भट्ट यांना दोषी ठरवत न्यायालयाने हा निकाल दिला आहे.