कळे (प्रतिनिधी) : ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर आणि मोटर सायकलच्या अपघातात शुभांगी गजानन कांबळे (वय २९, रा. बेळंकी, ता. कागल) ही महिला जागीच ठार झाली. तर मोटरसायकल चालविणारा तिचा भाऊ प्रदीप मारुती कांबळे (वय २२, रा. राजेंद्रनगर, कोल्हापूर)  हा सुदैवाने बचवला. ही घटना पन्हाळा तालुक्यातील गोठे-परखंदळे दरम्यानच्या रस्त्यावर काल (मंगळवार) सायंकाळी उशीरा घडली.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की,  गोठे येथील बहिणीकडे वाढदिवसाला शुभांगी आणि प्रदीप निघाले होते. तर कुंभी कारखान्याला ऊसाची वाहतूक करणारा ट्रॅक्टर गोठेवरून निघाला होता. दरम्यान, गोठे पूल पास करून ट्रॅक्टर पुढे आल्यानंतर प्रदीपच्या मोटर सायकल आणि  ट्रॉलीचा अपघात झाला. यामध्ये शुभांगीचा जागीच मृत्यू  झाला.

याबाबत ट्रॅक्टरचालक सर्जेराव उर्फ सरदार  धर्मा पाटील (वय ३६, रा.पणुत्रे ता.पन्हाळा) याच्यावर कळे पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.