गारगोटी (प्रतिनिधी) : म्हसवे (ता. भुदरगड) येथील पत्रकार अजित बाळासो यादव यांना श्रावस्ती बहुउद्देशीय सेवा संस्थेचा २०२१ चा आदर्श पत्रकार पुरस्कार प्रदान करण्यात आला. माजी खासदार निवेदिता माने यांच्या हस्ते व महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांच्या उपस्थित हा पुरस्कार देण्यात आला.  कार्यक्रम ना. बा. घोरपडे नाट्यगृह इचलकरंजीमध्ये संपन्न झाला.

अजित यादव अनेक वर्षे सामाजिक कार्यरत आहेत. त्यांना आतापर्यंत युवा गौरव, नवसाहिस्तिक, महाराष्ट्र गुणगौरव, पत्रकार भूषण, समाज मित्र, आदर्श पत्रकार, साहित्य सम्राट आण्णाभाऊ साठे स्मृती पुरस्कार आदी पुरस्कार मिळाले आहेत.

कार्यक्रमप्रसंगी राष्ट्रवादी प्रंतिक सदस्य मदन कारंडे, पंचगंगा कारखान्याचे संचालक प्रमोद पाटील, नगरसेविका सुनिता पोळ, केडीसीसी बँकचे निरीक्षक राजू रायकर, ज्येष्ठ नेते अजित शिंदे, माजी सरपंच निलेश पाटील, बी. जी. देशमुख, विलास कांबळे, संस्थेच्या अध्यक्षा भक्ती शिंदे, सचिव राहुल वराळे, अमोल शिंदे आदी  उपस्थित होते.