राशिवडे (प्रतिनिधी) : राधानगरी तालुक्याचे आरोग्याधिकारी डॉ. राजेंद्र शेटे यांनी अभिमानास्पद उपक्रम राबवला आहे. त्यांनी राशिवडे गावामध्ये घरोघरी जाऊन ज्यांनी अजूनही कोव्हिड लसीकरण केले नाही अशा नागरिकांचे प्रबोधन करून त्यांचे लसीकरण करण्यात आले. राशिवडेतील ग्रामस्थ दिवसभर शेतीच्या कामात व्यस्त असल्यामुळे सायंकाळच्या सत्रात या मोहिमेचे नियोजन केले आहे. सायंकाळी पाच ते रात्री उशिरापर्यंत ही लसीकरण मोहीम सुरू होती.

यामध्ये राशिवडे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश हाके, आर. एस.  पाटील, जावेद सनदी, के. के. पाटील, एम. एन. डोनगे, विक्रांत फडतरे, ग्रा.पं. कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका सहभागी झाल्या होत्या.