पुणे (प्रतिनिधी) :  मराठी सिनेसृष्टीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध मराठी कलाकार अनिकेत विश्वासराव याच्यविरोधात कौटुंबिक हिंसाचार आणि मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे. पुण्यातील अलंकार पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे. अनिकेतची पत्नी स्नेहा चव्हाण हिने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

अनिकेतच्या पत्नीने अनिकेतसह सासू, सासरे यांच्यावर कौटुंबिक हिंसाचार आणि मारहाण केल्याची तक्रार दाखल केली होती. तक्रार दाखल केल्यानंतर या प्रकरणी पुण्यातल्या अलंकार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्नेहानं अनिकेतसह सासरे चंद्रकांत विश्वासराव आणि सासू अदिती विश्वासराव या तिघां विरोधात गंभीर आरोप केले आहेत.

स्नेहाने आपल्या आरोपामध्ये, पती अनिकेत विश्वासरावनं १० डिसेंबर २०१८ ते २ फेब्रुवारी २०२१ या तीन वर्षांच्या काळात सिनेसृष्टीत आपल्यापेक्षा पत्नीचं नाव मोठं होईल, या भीतीपोटी वेळोवेळी नातेवाईकांसमोर अपमानास्पद वागणूक दिली होती. तसंच अनिकेतने  गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न देखील केल्याच स्नेहानं आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.