कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरातील निवृत्ती चौकात हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन आज (बुधवार) महाराष्ट्र रिक्षाचालक सेना, निवृत्ती चौक रिक्षा मित्र मंडळ व निवृत्ती तरुण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा करण्यात आला. यावेळी जेष्ठ शिवसैनिक पंडित पोवार यांच्या हस्ते बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करु पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी महाराष्ट्र रिक्षाचालक सेना जिल्हाप्रमुख राजेंद्र जाधव, रिक्षाचालक सेना शहरप्रमुख वसंत पाटील, किरण पडवळ, युवासेना शहरप्रमुख मनजीत माने, तेजस जाधव, विनायक शिंदे, शेखर जाधव, सचिन कापुसकर, श्रीकांत चिले, अमर भोसले, शिवसैनिक उपस्थित होते.