कळे (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील कळे येथे मटका अड्ड्यावर छापा टाकून दोघांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्यांच्याकडून ७ हजार १३५ रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. याबाबत पोलीसांनी धनाजी उर्फ चंद्रकांत विलास पोवार (वय ३१, रा. कळे, चांभारवाडा) आणि अनिकेत कदम (रा. यवलुज, ता. पन्हाळा) यांच्याविरोधात कॉन्स्टेबल सनिराज पाटील यांनी कळे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

कळे ते बाजारभोगाव रस्त्यालगत एका टायर पंक्चर दुकानासमोर कल्याण मटका सुरू होता. बुकी मालक धनाजी पोवार हा मटका मालक अनिकेत कदम याला दहा टक्के कमिशनवर मटक्याच्या चिठ्ठ्या देऊन तसेच मोबाईलद्वारे मटका चालवित होता. या छाप्या दरम्यान धनाजीकडून मोबाईल, रोख रक्कम असा ७ हजार १३५ रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला.