नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित गावांच्या पुनर्वसनाचा निर्णय

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यामध्ये अतिवृष्टीने निर्माण झालेल्या पुरासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित गावांचे पुनर्वसन करण्याबाबतच्या सर्वसमावेशक धोरणास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. त्यानुसार बाधित गाव, वाडी, तांड्यांचे नवीन ठिकाणी स्थलांतर करून त्यांना नागरी सुविधा देण्यात येतील. अतिवृष्टीमुळे आलेला पूर, जमिनीचे भूस्खलन किंवा जमिनीला मोठमोठ्या भेगा पडणे, डोंगर खचणे… Continue reading नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित गावांच्या पुनर्वसनाचा निर्णय

राष्ट्रीय स्पर्धेत शरद इन्स्टिट्यूटच्या दोन प्रोजेक्टला पारितोषिक

कोल्हापूर (प्रतिनिधी) : स्मार्ट इंडिया हॅकथॉन-२०२२ या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत यड्राव येथील शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांच्या दोन संघानी देशात व्दितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळविले. विद्यार्थ्यांचे व्हेनॉक आणि पॅरालिम्पिक व्हीलचेअर हे प्रोजेक्ट विजेते ठरले. देशभरात ७५ शहरांत या स्पर्धा झाल्या. केंद्र सरकारचे शिक्षण मंत्रालय, इनोव्हेशन सेल व एआयसीटीई यांनी स्पर्धा आयोजित केल्या होत्या.… Continue reading राष्ट्रीय स्पर्धेत शरद इन्स्टिट्यूटच्या दोन प्रोजेक्टला पारितोषिक

राज्यात १७ सप्टेंबरपासून ‘सेवा पंधरवडा’ चे आयोजन

मुंबई (प्रतिनिधी) : सामान्य नागरिकांच्या तक्रारी, अर्जांवर कालमर्यादेत निपटारा व्हावा, यासाठी राज्यात दि. १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज (सोमवारी) झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याशी दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधत या पंधरवड्यामध्ये नागरिकांचे प्रलंबित अर्ज निकाली… Continue reading राज्यात १७ सप्टेंबरपासून ‘सेवा पंधरवडा’ चे आयोजन

पाटगाव धरण शंभर टक्के भरले

कडगाव (प्रतिनिधी) : भुदरगड तालुक्याच्या पश्चिम भागात गेले चार दिवस पावसाची संतधार सुरू असून, पाटगाव येथील मौनी सागर जलाशय पूर्ण क्षमतेने भरल्याने धरणामध्ये शंभर टक्के पाणीसाठा झाला आहे. सांडव्यावरून पाण्याचा जोरदार विसर्ग सुरू आहे. धरण परिसरात पडणारा मुसळधार पावसामुळे वेदगंगा नदी तिसऱ्यांदा पात्रा बाहेर पडली आहे. पाटबंधारे विभागाने नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. मागील… Continue reading पाटगाव धरण शंभर टक्के भरले

‘आशा वर्कर्स, गट प्रवर्तकांचे थकीत मानधन त्वरित द्यावे’

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील आशा व गट प्रवर्तकांचे जुले व ऑगस्ट महिन्याचे थकीत मानधन त्वरित मिळावे या प्रमुख मागणीसह विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदन कॉ. भरमा कांबळे व कॉ. चंद्रकांत यादव यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळातर्फे जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांना देण्यात आले. निवेदनात आशा वर्कर्सना १००० रु. प्रमाणे एप्रिल २०२१ पासूनचे थकीत मानधन त्वरित… Continue reading ‘आशा वर्कर्स, गट प्रवर्तकांचे थकीत मानधन त्वरित द्यावे’

आंतरराष्ट्रीय पातळीवर शाश्वत संशोधनाची गरज : प्रा. अरुण पाटील

कोल्हापूर ( प्रतिनिधी) : ‘आंतरराष्ट्रीय पातळीवर आता शाश्वत संशोधनाची गरज आहे,’ असे मत संजय घोडावत विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. अरुण पाटील यांनी शिवाजी विद्यापीठातील स्तुति प्रशिक्षणाच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले. या संदर्भात भारत सरकारचे विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय प्रायोजित, स्तुति (सिनरजिस्टिक ट्रेनिंग प्रोग्रॅम अँड टेक्नॉलॉजिकल इन्फ्रास्ट्रक्चर) योजनेअंतर्गत ७ दिवसीय कार्यशाळेचे आयोजन १२ ते १८ सप्टेंबरदरम्यान केले… Continue reading आंतरराष्ट्रीय पातळीवर शाश्वत संशोधनाची गरज : प्रा. अरुण पाटील

ढोलगरवाडीच्या एकास वीजचोरी प्रकरणी वर्षाचा तुरुंगवास

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : ढोलगरवाडी (ता. चंदगड) येथील एका लघुदाब औद्योगिक ग्राहकास वीज चोरी करणे महागात पडले आहे. वीजचोरीप्रकरणी भाऊराव संभाजी पाटील (वय ४०) यांना गडहिंग्लज न्यायालयाने एका वर्षाच्या कैदेची शिक्षा ठोठावली आहे. या ग्राहकाने वीजमीटरमध्ये छेडछाड करून २४ हजार ६७५ वीज युनिटची, आर्थिक मूल्याप्रमाणे २ लाख ५० हजार रुपयांची वीजचोरी केली होती. दि. १९ नोव्हेंबर… Continue reading ढोलगरवाडीच्या एकास वीजचोरी प्रकरणी वर्षाचा तुरुंगवास

केएमटीची मुडशिंगी, चुये-येवती मार्गावरील बस सेवा बंद

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कमी उत्पन्न प्राप्त होत असलेल्या मुडशिंगी आणि चुये-येवती या मार्गावरील बस सेवा दि. १३ सप्टेंबरपासून बंद करण्यात येत आहे, याची या मार्गावरील सर्व प्रवासी नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन केएमटी प्रशासनाने केले आहे. केएमटी उपक्रमाची आर्थिक परिस्थिती खालावलेली आहे. कर्मचाऱ्यांचे वेतनामध्ये महागाई भत्ता व घरभाडे भत्त्याचा समावेश करण्यात आला आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची… Continue reading केएमटीची मुडशिंगी, चुये-येवती मार्गावरील बस सेवा बंद

विशाल लोहार व्यसनमुक्ती, मधुमेह मुक्तीदूत पुरस्काराने सन्मानित

कळे (प्रतिनिधी) : समर्थ सोशल फाऊंडेशन, न्यूट्रीफिल हेल्थ प्रॉडक्ट यांच्या संयुक्त विद्यमानाने शिवशंभू निवासी व्यसनमुक्ती केंद्र व जनरल हॉस्पिटल अभियानांतर्गत २०२२ चा राज्यस्तरीय व्यसनमुक्ती व मधुमेह मुक्तीदूत पुरस्कार शिंगणापूर, ता. करवीर येथील विशाल नारायण लोहार यांना प्रदान करण्यात आला. लोहार यांच्या कार्याची दखल घेत कोल्हापूर येथे मुंबई मंत्रालयाचे सहायक संचालक वित्त विभागातील अतुल आकुर्डे, युवा… Continue reading विशाल लोहार व्यसनमुक्ती, मधुमेह मुक्तीदूत पुरस्काराने सन्मानित

लम्पी रोगाबाबत पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी सतर्क राहावे

जयसिंगपूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये जनावरांच्या  संसर्ग वाढताना दिसत आहे. शिरोळ तालुक्यात सध्या १५ जनावरांमध्ये प्राथमिक लक्षणे दिसून येत आहेत. या जनावरांमध्ये दिसणाऱ्या या लक्षणानंतर त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू केले आहेत. पशुवैद्यकीय विभागाने याबाबत पशुधन मालकांमध्ये जनजागृती करून या त्वचा रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात, असे आदेश आ. राजेंद्र पाटील-यड्रावकर… Continue reading लम्पी रोगाबाबत पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी सतर्क राहावे

error: Content is protected !!