कागल येथे १८ सप्टेंबर रोजी झिम्मा फुगडी स्पर्धा

कागल (प्रतिनिधी) : कागल येथे रविवार, दि. १८ सप्टेंबर रोजी एक लाख रुपये बक्षिसांची पश्चिम महाराष्ट्रातील भव्य झिम्मा-फुगडी, तसेच उखाणे, जात्यावरील ओव्या, पारंपरिक वेशभूषा या स्पर्धा होणार आहेत. राजमाता जिजाऊ महिला समिती व राजे विक्रमसिंह घाटगे फाऊंडेशनच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन केले आहे, अशी माहिती राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा नवोदिता घाटगे यांनी पत्रकार परिषदेत… Continue reading कागल येथे १८ सप्टेंबर रोजी झिम्मा फुगडी स्पर्धा

…तर ग्रामीणमधून दूध, भाजीपाला बंद करण्याचा इशारा

टोप (प्रतिनिधी) : कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीला आमचा विरोध आहे आणि तो कायमच राहणार आहे. केएमटी बंद केली, तर आम्ही दूध, भाजीपाला बंद करु शकतो हे विसरू नका, असा इशारा शिरोलीचे सरपंच शशिकांत खवरे यांनी दिला आहे. कृती समितीने भान ठेवून शहराची हद्दवाढ मागणी करावी. यात जनतेला त्रास होईल, असे कोणतेही पाऊल उचलू नये. अन्यथा आम्ही… Continue reading …तर ग्रामीणमधून दूध, भाजीपाला बंद करण्याचा इशारा

कोल्हापूर-मुंबई विमानसेवा ४ ऑक्टोबरपासून

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर-मुंबई मार्गावर विमानसेवा सुरू व्हावी, अशी प्रवाशांची अनेक दिवसांपासूनची मागणी होती. या पार्श्‍वभूमीवर खासदार धनंजय महाडिक यांनीही केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे पाठपुरावा सुरू ठेवला होता, त्याला यश आले आहे. ४ ऑक्टोबरपासून स्टार एअरची कोल्हापूर-मुंबई विमानसेवा नियमितपणे सुरू होत आहे. या विमानसेवेमुळे कोल्हापूर-मुंबई असा प्रवास करणार्‍या प्रवाशांची सोय होणार आहे.… Continue reading कोल्हापूर-मुंबई विमानसेवा ४ ऑक्टोबरपासून

ज्ञानवापी मशीद प्रकरणी २२ सप्टेंबरला पुढील सुनावणी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ज्ञानवापी मशिदीप्रकरणी पुढील सुनावणी २२ सप्टेंबरला होणार आहे. आज वाराणसी जिल्हा न्यायालयात याबाबत सुनावणी पार पडली. हिंदू पक्षाच्या बाजूने न्यायालायने निर्णय घेतला असून, हे प्रकरण सुनावणी योग्य असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. दरम्यान, याप्रकरणी सुनावणी होऊ नये याकरिता मुस्लिम पक्षाने याचिका केली होती. ही याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे. वाराणसीतील ज्ञानवापी मशीद… Continue reading ज्ञानवापी मशीद प्रकरणी २२ सप्टेंबरला पुढील सुनावणी

ग्रामपंचायतींच्या पदांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जानेवारी 2021 ते मे 2022 या कालावधीत मुदत संपलेल्या व जून 2022 ते सप्टेंबर 2022 मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या तसेच नव्याने स्थापित ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी (सदस्य पदासह थेट सरपंच) संगणक प्रणालीव्दारे प्रत्यक्ष राबविण्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी दिली आहे. निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे-… Continue reading ग्रामपंचायतींच्या पदांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर…

सतेज पाटील फाऊंडेशनतर्फे महिलांसाठी स्वच्छतागृहे

कोल्हापूर (प्रतिनिधी) : येथील सतेज ऊर्फ बंटी डी. पाटील फाऊंडेशनच्या वतीने गणेशोत्सव काळात होणारी महिला भाविकांची गैरसोय लक्षात घेऊन दि. ९ सप्टेंबरअखेर शहरातील गर्दीच्या प्रमुख ठिकाणी महिला स्वच्छतागृहांची व्यवस्था करण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या काळात कोल्हापुरातील आकर्षक मूर्ती तसेच देखावे पाहण्यासाठी कोल्हापूरकर सहकुटुंब घराबाहेर पडतात. अनंत चतुर्दशी दिवशी मिरवणूक पाहण्यासाठी प्रचंड गर्दी होते. यामध्ये महिलांची संख्या… Continue reading सतेज पाटील फाऊंडेशनतर्फे महिलांसाठी स्वच्छतागृहे

नॅनोसायन्सच्या विद्यार्थ्यांची भाभा अणुसंशोधन केंद्रात निवड

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शिवाजी विद्यापीठाच्या स्कूल ऑफ नॅनोसायन्स अँड टेक्नॉलॉजी या अधिविभागामध्ये बी.एस्सी.- एम.एस्सी. नॅनोसायन्स अँड टेक्नॉलॉजी (५ वर्षांचा एकात्मिक) अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षातील विद्यार्थी विशाल पांडुरंग भांदिगरे (रा. पुंगाव, जि. कोल्हापूर) आणि अनुषा सुरेश अगसिबागिल (रा. कोल्हापूर) यांची संशोधन आणि विकासासाठी अग्रेसर असणाऱ्या भाभा अणुसंशोधन केंद्र, मुंबई येथे एक वर्षाच्या प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे. तसेच… Continue reading नॅनोसायन्सच्या विद्यार्थ्यांची भाभा अणुसंशोधन केंद्रात निवड

‘घरगुती गणेशमूर्तींची विटंबना; अधिकाऱ्यांवर कारवाई करा’

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूरकरांनी दान केलेल्या हजारो गणेशमूर्तींची विटंबना होईल, अशा प्रकारे विसर्जनास जबाबदार असलेल्या महापालिका आणि पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी भाजपाच्या वतीने करण्यात आली आहे. जलस्रोतांचे प्रदूषण रोखण्यासाठी प्रशासनाने गेले काही वर्षे सातत्याने राबविलेल्या गणेशमूर्ती दान उपक्रमास पुरोगामी कोल्हापूरकर प्रचंड प्रतिसाद देत आहेत; परंतु या दान केलेल्या… Continue reading ‘घरगुती गणेशमूर्तींची विटंबना; अधिकाऱ्यांवर कारवाई करा’

‘डी. वाय.’ अभियांत्रिकीमधील ‘केमिकल’च्या ५७ विद्यार्थ्यांना नोकरी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील केमिकल विभागाच्या ५७ विद्यार्थ्यांची नामांकित कंपनीमध्ये नोकरीसाठी निवड झाली आहे. डीएक्ससी, वरली, सुदर्शन केमिकल्स, लक्ष्मी ऑरगॅनिक्स, स्मृती ऑरगॅनिक्स, अक्वाटेक, कॉग्निझंट, बिर्ला सॉफ्ट, डीआरडीओ आदी नामांकित कंपन्यांमध्ये या विद्यार्थ्यांना सुविधांसोबत भरघोस पगाराच्या नोकऱ्या प्राप्त झाल्या आहेत. केमिकल विभागाने आपली प्लेसमेंटची यशस्वी घोडदौड यंदाही कायम ठेवली आहे. लस, औषधे… Continue reading ‘डी. वाय.’ अभियांत्रिकीमधील ‘केमिकल’च्या ५७ विद्यार्थ्यांना नोकरी

महावीर अध्यासनास उपाध्ये यांच्यातर्फे दहा हजाराची देणगी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : येथील अॅड. अशोक उपाध्ये यांनी शिवाजी विद्यापीठाच्या भगवान महावीर अध्यासनाच्या प्रस्तावित इमारत बांधकामासाठी दहा हजाराची देणगी दिली आहे. त्यांच्या मातोश्री अनुसया तेजपाल उपाध्ये यांच्या शताब्दी पूर्ततेनिमित्त भगवान महावीर अध्यासनाचे डॉ. विजय ककडे यांच्याकडे ही देणगी सुपूर्द केली. अॅड. अशोक उपाध्ये यांच्या कुटुंबीयांचा भारतीय स्वातंत्र्य लढ्यात महत्वाचा सहभाग होता. या त्यांच्या कार्याबद्दल भगवान… Continue reading महावीर अध्यासनास उपाध्ये यांच्यातर्फे दहा हजाराची देणगी

error: Content is protected !!