कळे (प्रतिनिधी) : समर्थ सोशल फाऊंडेशन, न्यूट्रीफिल हेल्थ प्रॉडक्ट यांच्या संयुक्त विद्यमानाने शिवशंभू निवासी व्यसनमुक्ती केंद्र व जनरल हॉस्पिटल अभियानांतर्गत २०२२ चा राज्यस्तरीय व्यसनमुक्ती व मधुमेह मुक्तीदूत पुरस्कार शिंगणापूर, ता. करवीर येथील विशाल नारायण लोहार यांना प्रदान करण्यात आला.

लोहार यांच्या कार्याची दखल घेत कोल्हापूर येथे मुंबई मंत्रालयाचे सहायक संचालक वित्त विभागातील अतुल आकुर्डे, युवा उद्योगपती शिव समर्थ असोसिएटचे मॅनिजिंग डायरेक्टर विशाल जाधव, मोटर वाहन निरीक्षक संदीप गडकर यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. यावेळी समर्थ संस्थेचे संस्थापक सादिक शेख, व्यसनमुक्ती केंद्राचे संस्थापक सागर देसाई, संचालक अस्लम शेख, सुहास पाटील, सर्व पदाधिकारी, विस्तार अधिकारी व सभासद उपस्थित होते.