कोल्हापूर (प्रतिनिधी) : स्मार्ट इंडिया हॅकथॉन-२०२२ या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत यड्राव येथील शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांच्या दोन संघानी देशात व्दितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळविले. विद्यार्थ्यांचे व्हेनॉक आणि पॅरालिम्पिक व्हीलचेअर हे प्रोजेक्ट विजेते ठरले. देशभरात ७५ शहरांत या स्पर्धा झाल्या. केंद्र सरकारचे शिक्षण मंत्रालय, इनोव्हेशन सेल व एआयसीटीई यांनी स्पर्धा आयोजित केल्या होत्या.

या अंतर्गत केंद्र सरकार, राज्य सरकार व विविध क्षेत्रातील नामांकित कंपन्यांनी ५६३ समस्यांचे उपाययोजन (प्रॉबलेम स्टेटमेंट) मागविले होते. त्यामध्ये देशभरातून ३० हजारपेक्षा अधिक संघ सहभागी झाले होते. त्यांनी विविध समस्यावर नवीन संकल्पना व समस्यांचे उपाययोजन सादर केल्या. त्यामध्ये शरद इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी चेन्नई, बेंगळुरू, पुणे आणि भोपाळ येथील स्पर्धेत सहभाग घेतला होता. पुणे येथील स्पर्धेत मेकॅनिकलच्या शुभम पोवार, आदित्य आमणे, दिया सनदी, सूरज लाल, अरुण कागवाडे, पूनम चौगुले या विद्यार्थ्यांनी स्पोर्टस् अॅण्ड फिटनेस विभागात पॅरालिम्पिक व्हीलचेअर हा हार्डवेअर प्रोजेक्ट सादर केला होता.

भोपाळ येथे सिव्हीलच्या ऋषभ सुतार, सुमित वेदपाठक, ओंकार सातारले, प्रथमेश मगदूम, ऋत्विक कुटवाडे, ऋतुजा कुटवाडे यांनी रिनीव्हेबल अॅण्ड सस्टेनेबल एनर्जी विभागात व्हेनॉक हा सॉफ्टवेअर प्रोजेक्ट सादर केला. ह्या दोन्ही प्रोजेक्टला देशपातळीवर दुसरा क्रमांक मिळाला. विजेत्या संघांना ७५ हजार रुपयांचे बक्षीस मिळाले. विद्यार्थ्यांना प्रा. अवेसअहमद हुसेनी, प्रा. मनाली साबळे, प्रा. आशीष उदगावे, प्रा. संग्राम दोपारे, प्रा. विनोद नेजकर, प्रा. आशीष देसाई, प्रा.प्रविण यादव, एस.आय.एच. समन्वयक प्रा. धनश्री बिरादार यांच्यासह सर्व प्राध्यापकांनी मार्गदर्शन लाभले. संस्थेचे अध्यक्ष आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, कार्यकारी संचालक अनिल बागणे यांनी विद्यार्थ्यी व प्राध्यापकांचे अभिनंदन केले.