सत्यमेव जयते संघटनेच्या सचिवपदी जी. एस. कांबळे

कोतोली (प्रतिनिधी) : मुंबई येथील सत्यमेव जयते संघटनेच्या महाराष्ट्र सचिवपदी गगनबावडा तालुक्यातील जी. एस. कांबळे यांची निवड करण्यात आली आहे. कांबळे यांना निवडीचे पत्र प्रदेशाध्यक्ष डॉ. अफजल देवळेकर यांनी दिले आहे. मुंबई येथे अनेक वर्षांपासून विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या ‘सत्यमेव जयते’ या संघटनेचे संपूर्ण महाराष्ट्रभर पदाधिकारी आहेत. प्रदेश सचिवपदी निवड झालेले जी. एस. कांबळे हे… Continue reading सत्यमेव जयते संघटनेच्या सचिवपदी जी. एस. कांबळे

लम्पीची साथ : आर्थिक मदत देण्याची खा. धैर्यशील मानेंची मागणी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर व सांगली जिल्हयामधील जनावरांच्या लम्पी साथीवर त्वरित उपाययोजना करण्याबाबत व लम्पी साथीमधील मृत जनावरांना आर्थिक मदत देण्याबाबत खासदार धैर्यशील माने यांनी पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना पत्र देऊन चर्चा केली. यावर मंत्री विखे-पाटील यांनी स्वतः कोल्हापूर जिल्ह्यात येऊन आढावा घेणार असल्याचे खासदार धैर्यशील माने यांना सांगितले. कोल्हापूर व… Continue reading लम्पीची साथ : आर्थिक मदत देण्याची खा. धैर्यशील मानेंची मागणी

फसवणूक प्रकरणी निवेदिता माने यांच्या अटकेची मागणी

सोलापूर (प्रतिनिधी) : हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने यांच्या मातोश्री व माजी खासदार निवेदिता माने यांनी एकाची १  कोटी ५५ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. दरम्यान, हे प्रकरण २०१९ सालचे असल्याचे सांगण्यात आले आहे. मागच्या तीन वर्षांपूर्वीच्या फसवणूक प्रकरणात माजी खासदार निवेदिता माने पुन्हा संकटात सापडल्या आहेत. दरम्यान, तक्रारदाराने माजी खासदार माने यांना लवकरात… Continue reading फसवणूक प्रकरणी निवेदिता माने यांच्या अटकेची मागणी

नंदवाळमध्ये दिसलेला बिबट्या नव्हे तर तो तरसच

राशिवडे (प्रतिनिधी)  : करवीर तालुक्यातील नंदवाळ येथील परिसरात आज बुधवारी सकाळी बिबट्यासदृश प्राणी आढळल्याने भीतीचे वातावरण पसरले होते; पण तो प्राणी तरस असल्याचे निष्पन्न झाले आहे. वाशी व नंदवाळच्या मध्यभागी असणाऱ्या जगताप मळ्यात वैरणीसाठी गेलेले शेतकरी व जनावरांना चारण्यासाठी गेलेल्या लोकांना हा प्राणी आढळून आला आहे. ग्रामस्थांकडून माहिती मिळताच काही वेळापूर्वीच वनखात्याचे पथक तपासासाठी नंदवाळ… Continue reading नंदवाळमध्ये दिसलेला बिबट्या नव्हे तर तो तरसच

हणमंत साठेंच्या रूपाने रिपाइंचा ढाण्या वाघ हरपला : उत्तम कांबळे

कोल्हापूर (प्रतिनिधी) : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मातंग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हणमंत साठे यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीची व रिपब्लिकन पक्षाची फार मोठी हानी झाली आहे. साठेंच्या रूपाने रिपाइंचा ढाण्या वाघ हरपल्याची प्रतिक्रिया रिपाइंचे जिल्हाध्यक्ष उत्तमदादा कांबळे यांनी व्यक्त केली. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आ) मातंग आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले… Continue reading हणमंत साठेंच्या रूपाने रिपाइंचा ढाण्या वाघ हरपला : उत्तम कांबळे

पुंछमध्ये बस दरीत कोसळून ११ जण ठार, २५ जखमी

जम्मू (वृत्तसंस्था) : काश्मिरातील पुंछमध्ये मिनी बस दरीत कोसळून ११ जण ठार झाले, तर २५ जण जखमी झाले आहेत. लष्कराच्या मदतीने सर्व जखमींना मंडी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मंडीचे तहसीलदार शहजाद लतीफ यांनी या अपघाताची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, बस मंडीहून सावजियांकडे जात होती. यादरम्यान बस दरीत कोसळली. जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज… Continue reading पुंछमध्ये बस दरीत कोसळून ११ जण ठार, २५ जखमी

‘ब्रह्मास्त्र’ची बॉक्स ऑफिसवर जादू कायम

मुंबई(प्रतिनिधी) : अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूरयांच्या ब्रह्मास्त्र या चित्रपटाची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे. हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. चित्रपटातील ‘VFX’ ला आणि गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. हा चित्रपट प्रदर्शित होऊन पाच दिवस झाले आहेत. पाचव्या दिवशी देखील या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. पाचव्या… Continue reading ‘ब्रह्मास्त्र’ची बॉक्स ऑफिसवर जादू कायम

प्री-ओपनिंग सत्रात सेन्सेक्स ११०० अंकानी कोसळला

दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकन शेअर बाजारात झालेल्या पडझडीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. प्री-ओपनिंगमध्ये सेन्सेक्समध्ये  एक हजार अंकांची घसरण दिसून आली, तर निफ्टी तब्बल २९८ अंकांची मोठी घसरण दिसून आली. अमेरिकेत पुन्हा महागाई वाढल्याने अमेरिकन शेअर बाजारात घसरण झाली होती. महागाई वाढल्याने फेडरल रिझर्व्हकडून व्याज दर वाढण्याची शक्यता आहे. शेअर बाजारात प्री-ओपनिंग सत्रात घसरण… Continue reading प्री-ओपनिंग सत्रात सेन्सेक्स ११०० अंकानी कोसळला

गोकुळतर्फे लम्पीस्कीनचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मोफत लसीकरण : विश्‍वास पाटील

कोल्‍हापूर (प्रतिनिधी) : गोकुळ दूध संघ दूध उत्पादक शेतकऱ्यांसोबत सदैव सोबत आहे. लम्पीस्कीनचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी गोकुळमार्फत मोफत लसीकरण सुरु आहे. संघाच्या सर्व पशुवैद्यकीय केंद्रावर लसीकरणाची सुविधा आहे. पशुवैद्यकीय केंद्रावर लस पुरवठा करण्यासंबंधी नियोजन केले असल्याचे गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील यांनी सांगितले. तसेच दूध संघाचे पशुवैद्यकीय अधिकारी, एलएसएस आणि कृत्रिम रेतन सेवकांच्यामार्फत मोफत लसीकरणाचे नियोजन केले… Continue reading गोकुळतर्फे लम्पीस्कीनचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मोफत लसीकरण : विश्‍वास पाटील

सैफ सेंटर संशोधक विद्यार्थ्यांसाठी बनले अनोखे केंद्र : प्रा. सोनकवडे

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सैफ सेंटर हे संशोधक विद्यार्थ्यांसाठी अनोखे केंद्र बनले असल्याचे प्रतिपादन प्रा. आर. जी. सोनकवडे यांनी केले. शिवाजी विद्यापीठात स्तुति अंतर्गत चालू असलेल्या आठवडी प्रशिक्षण कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवसाच्या सत्रात बोलत होते. प्रशिक्षण कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी सहभागी झालेल्या सर्व शिक्षक संशोधक विद्यार्थी यांना प्रथम सत्रात संजय घोडावत विद्यापीठाचे डॉ. संभाजी पवार यांनी सोलर सेल… Continue reading सैफ सेंटर संशोधक विद्यार्थ्यांसाठी बनले अनोखे केंद्र : प्रा. सोनकवडे

error: Content is protected !!