मुंबई(प्रतिनिधी) : अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूरयांच्या ब्रह्मास्त्र या चित्रपटाची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे. हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. चित्रपटातील ‘VFX’ ला आणि गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. हा चित्रपट प्रदर्शित होऊन पाच दिवस झाले आहेत. पाचव्या दिवशी देखील या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे.

पाचव्या दिवशी म्हणजेच १३ सप्टेंबर या चित्रपटाने जळपास १२.५० कोटींची कमाई केली आहे. चौथ्या दिवशी या चित्रपटाने १६ कोटींची कमाई केली आहे. प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्या दिवशी या चित्रपटाने ३७ कोटींची कमाई केली; तर दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने ४२ कोटींची कमाई केली. रविवारी या चित्रपटाने ४५ कोटी कमावले. पाच दिवसांमध्ये या चित्रपटाने जवळपास १५२.५० कोटींची कमाई केली आहे.