‘घरफाळा घोटाळा प्रकरणी संजय भोसले यांना निलंबित करा’

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महापालिकेतील घरफाळा घोटाळयास जबाबदार असलेले माजी कर निर्धारक व अंतर्गत लेखापरीक्षक संजय भोसले यांना तत्काळ निलंबित करावे, अशी मागणी आज कोल्हापूर विकास आघाडीच्या वतीने करण्यात आली. संजय भोसले यांनी घरफाळा घोटाळा करून महापालिकेचे प्रचंड मोठे नुकसान केले आहे. भोसले यांच्या विरोधात आजवर अनेक वेळा आंदोलने झाली. अनेक तक्रारी देखील झाल्या आहेत. तरी… Continue reading ‘घरफाळा घोटाळा प्रकरणी संजय भोसले यांना निलंबित करा’

कोल्हापुरात मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम

कोल्हापूर (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७३ व्या वाढदिवसानिमित्त मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापुरात भाजपच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात भाजपाच्या वतीने १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या काळात ‘सेवा पंधरवडा’ म्हणून अनेक सेवाकार्यांचे आयोजन करण्यात आले आहे. या संदर्भात कोल्हापुरात बैठक जिल्हा कार्यालयात झाली. यामध्ये मोदींच्या… Continue reading कोल्हापुरात मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम

बल्क ड्रग पार्क प्रकल्पही महाराष्ट्राबाहेर जाणार : आदित्य ठाकरे

मुंबई (प्रतिनिधी) : वेदांता समूह आणि फॉक्सकॉन यांच्या भागीदारीतून उभा राहणारा प्रकल्प गुजरातला गेल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी आणखी एक आरोप शिंदे-फडणवीस सरकारवर केला आहे. रायगडमध्ये होणारा बल्क ड्रग पार्कचा प्रकल्पही गुजरातेतील भरूचमध्ये जाणार आहे. असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे. रायगडमध्ये बल्ब ड्रग पार्क प्रकल्प येणार होता. त्यासाठी… Continue reading बल्क ड्रग पार्क प्रकल्पही महाराष्ट्राबाहेर जाणार : आदित्य ठाकरे

गोव्यात काँग्रेसला धक्का, ८ आमदारांची पक्षाला सोडचिठ्ठी

पणजी (वृत्तसंस्था) : गोव्यातील काँग्रेसच्या ११ पैकी ८ आमदारांनी बुधवारी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह सर्व आमदारांनी विधानसभेत पोहोचून वेगळे होत असल्याचे पत्र सभापती रमेश तावडकर यांना दिले. गोवा भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तनवडे यांनी सांगितले की, सर्व आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. देशात काँग्रेस पक्षाला उभारी देण्यासाठी ‘भारत जोडो यात्रा’ अभियानाची सुरूवात झाली… Continue reading गोव्यात काँग्रेसला धक्का, ८ आमदारांची पक्षाला सोडचिठ्ठी

हॅकॅथॉनच्या संयोजनात प्रसाद दिवाण यांचे योगदान

कोल्हापूर (प्रतिनिधी) : केंद्र सरकारच्या शिक्षण विभागाच्या नावीन्यपूर्ण उपक्रम कक्षाच्या वतीने युवा संशोधकांना चालना देण्यासाठी स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन-२०२२ चे आयोजन कोल्हापूरच्या केआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयात करण्यात आले होते. या  हॅकॅथॉन संयोजन केंद्राच्या नोडल अधिकारीपदाची जबाबदारी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता प्रसाद दिवाण यांनी पार पाडली. स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन या उपक्रमाव्दारे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील विद्यार्थ्यांसमोर विविध समस्या वा प्रश्न मांडून… Continue reading हॅकॅथॉनच्या संयोजनात प्रसाद दिवाण यांचे योगदान

डॉ. तेजस्विनी देसाई यांच्या पुस्तकाचे १९ सप्टेंबर रोजी प्रकाशन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : येथील डॉ. तेजस्विनी देसाई यांनी लिहिलेल्या ‘विज्ञानातील नोबेल शलाका’ या पुस्तकाचे प्रकाशन सोमवार, दि. १९ सप्टेंबर रोजी होत आहे. दसरा चौकातील राजर्षी शाहू स्मारक भवन येथे सायंकाळी ५ वाजता हा समारंभ होणार आहे. विज्ञान साहित्यामध्ये भर घालणाऱ्या या मराठी पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ शास्त्रज्ञ व लेखक डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर यांच्या हस्ते होणार असून,… Continue reading डॉ. तेजस्विनी देसाई यांच्या पुस्तकाचे १९ सप्टेंबर रोजी प्रकाशन

जैन सेवासंघातर्फे महावीर अध्यासनास १.११ लाखाची देणगी

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शिवाजी विद्यापीठाच्या भगवान महावीर अध्यासन केंद्रास जैनसेवा संघातर्फे भगवान महावीर अध्यासनास १ लाख ११ हजार १११ रुपयांची देणगी देण्यात आली. भगवान महावीर अध्यासनासाठी १३ कोटी रुपये खर्चून भव्य वास्तू उभारली जाणार आहे. यातून जैनधर्माचे शास्त्रीय संशोधन व युवकांना मार्गदर्शन यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत कार्य केले जाणार आहे. या कार्यासाठी जैनसेवा संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी… Continue reading जैन सेवासंघातर्फे महावीर अध्यासनास १.११ लाखाची देणगी

कोल्हापुरात २४, २५ सप्टेंबर रोजी प्लास्टिक सर्जरी शिबिर

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात भारतीय जैन संघटना व डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. डॉ. शरदकुमार दीक्षित यांच्या स्मरणार्थ डी. वाय. पाटील हॉस्पिटल येथे दि. २४ व २५ सप्टेंबर रोजी प्लास्टिक सर्जरी शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती डॉ. शीतल पाटील यांनी यांनी पत्रकार परिषदेत दिली. ही संघटना गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक क्षेत्रात… Continue reading कोल्हापुरात २४, २५ सप्टेंबर रोजी प्लास्टिक सर्जरी शिबिर

राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांच्या संख्येत दीडपट वाढ

मुंबई (प्रतिनिधी) : महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना समाजसेवेची आवड निर्माण व्हावी, सामजिक प्रश्नांची जणीव होऊन राष्ट्रीय सेवा योजनेत विद्यार्थ्यांचा अधिक सहभाग वाढावा यासाठी या योजनेतील विद्यार्थ्यांच्या संख्येत दीडपट म्हणजे ५ लाख करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. विद्यार्थ्यांना आपल्या शिक्षणाचा उपयोग… Continue reading राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांच्या संख्येत दीडपट वाढ

रेशनधान्य बंदचे परिपत्रक रद्द करण्याची मागणी

कुंभोज (प्रतिनिधी)  : हातकणंगले तालुका रेशनिंग कृती समितीचे अध्यक्ष, कुंभोज ग्रा.पं. सदस्य अजित देवमोरे यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना रेशनधान्य बंद करण्याचे परिपत्रक रद्द करावे, या मागणीचे निवेदन दिले आहे. पिवळे व केशरी रेशनकार्डचा लाभ घेणारे सरकारी कर्मचारी, करदाते, खासगी नोकरदार, घरात चारचाकी वाहन व तत्सम सुविधा असणारे, अर्थिकदृष्ट्या सक्षम असणारी कुटुंबे शोधून त्यांना पांढऱ्या… Continue reading रेशनधान्य बंदचे परिपत्रक रद्द करण्याची मागणी

error: Content is protected !!