कोल्हापूर ( प्रतिनिधी ) कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदार संघाच्या विकासासाठी भरघोस निधी आणण्याचा धडाका माजी आमदार अमल महाडिक यांनी सुरूच ठेवला आहे. पर्यटन विकास आराखड्यातून दक्षिण साठी त्यांनी तब्बल सव्वा दोन कोटी रुपयांचा निधी खेचून आणला आहे.

या निधीतून निगवे खालसा येथील नृसिंह सरस्वती स्वामी मंदिराजवळ रस्ते आणि गटारी करण्यासाठी 25 लाख रुपये, गिरगाव येथील रेणुका माता मंदिराचा विकास करण्यासाठी 50 लाख, गडमुडशिंगी येथील धुळसिद्ध बिरदेव मंदिराच्या आवारात प्रसाद मंडप उभारण्यासाठी 50 लाख, कंदलगाव येथील हनुमान मंदिराकडे जाणारा रस्ता करण्यासाठी 50 लाख आणि नेर्ली येथील बिरदेव मंदिर परिसरामध्ये आरसीसी कंपाउंड आणि रस्ता करण्यासाठी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

या निधीतून लवकरच विकास कामांचा शुभारंभ होणार आहे. पदावर नसतानाही मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी माजी आमदार अमल महाडिक यांनी केलेला पाठपुरावा कौतुकाचा विषय ठरतोय.

कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात असणाऱ्या मंदिर आणि पर्यटन स्थळांच्या विकासासाठी निधी प्राप्त करून देण्यासाठी इथून पुढच्या काळातही प्रयत्नशील राहणार असल्याचे महाडिक यांनी सांगितले.