आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून संपूर्ण महाराष्ट्रभर पक्ष बांधणीस सुरुवात झाली आहे.याच पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातीलही नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती करण्यात आल्या. यामध्ये आज भाजप जिल्हा ग्रामीण (पूर्व) उपाध्यक्षपदी प्रकाश बळवंत देशमुख यांची निवड करण्यात आली. प्रकाश देशमुख यांचे पन्हाळा तालुक्यातील ग्रामीण भागातील काम पाहता येणाऱ्या काळामध्ये (पूर्व) ग्रामीण चे जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर यांच्यासोबत चांगल्या प्रकारे पक्षाचे काम करतील विश्वास यावीली पक्षाच्या जिल्ह्यातील वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्यावर टाकला आहे. त्यांना या निवडीचे पत्र भारतीय जनता पार्टी कोल्हापूर जिल्हा कार्यालयामध्ये ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर व महाराष्ट्र महिला मोर्चा उपाध्यक्ष शोमिका महाडिक यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

या निवडीवेळी पन्हाळा तालुका अध्यक्ष अमरसिंह भोसले, प्रदेश सदस्य अजय चौगुले, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विजेंद्र माने, कोल्हापूर जिल्हा सरचिटणीस विठ्ठल पाटील,युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस रविराज गाताडे, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत बुगले यांच्या सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .या निवडीसाठी शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, राज्यसभा खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार अमर महाडिक ,यांचे मोलाचे सहकार्य लाभले असून प्रकाश देशमुख यांच्या निवडीमुळे पन्हाळा तालुक्याच्या भाजप कार्यकारिणीत नवचैतन्य निर्माण झाले आहे.