टोप ( प्रतिनिधी ) ऊस दरावरून स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांनी आज राष्ट्रीय महामार्ग चक्काजाम केला आहे. यामुळे दिवसभरात पुणे – बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर तब्बल दहा – दहा किलो मिटरच्या रांगा लागल्याचे चित्र आहे. दरम्यान दुपारी श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी या आंदोलनाला भेट देत पाठिंबा व्यक्त केला आहे.

दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील काही कारखानदार जिल्हाधिकारी कार्यालयात पुन्हा स्वाभिमानीच्या भेटीसाठी आले असल्याची माहिती समोर आली असून, कोल्हापूर जिल्ह्याचे पोलिस प्रमुख महेंद्र पंडित व श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या साक्षीने पुन्हा चर्चा होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार माजी खासदार राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे की, जिल्हाधिकारी कार्यालयात येण्यापूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील कारखानदार अधिकच्या शंभर रुपये दरासाठी सकारात्मक असून याबाबत तोडगा निघेल असं ही म्हटलं आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील चर्चा नेमकी कोणत्या दिशेला जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.