आचारसंहिता लागू; गोवा ‘शिगमोत्सव’ आयोजनावर निर्बंधाची शक्यता वाढली ?

पणजी ( प्रतिनिधी ) लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच संपूर्ण देशात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. दरम्यान, गोव्यातील वसंतोत्सव शिग्मोमध्ये सहभागी होणाऱ्या कलाकारांना या महोत्सवावर बंदी येऊ शकते, अशी भीती वाटत आहे. 19 एप्रिल रोजी निवडणुका सुरू होतील, त्यानंतर 26 एप्रिल, 7 मे, 13 मे, 20 मे, 25 मे आणि 1 जून असे सात टप्पे… Continue reading आचारसंहिता लागू; गोवा ‘शिगमोत्सव’ आयोजनावर निर्बंधाची शक्यता वाढली ?

लोकसभा निवडणुकीसोबतच आता ‘या’ चार राज्यांमध्येही घोषणा***

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) 2024 च्या लोकसभा निवडणुकीची प्रतीक्षा आता संपणार आहे. निवडणूक आयोगाने शनिवारी दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद बोलावली आहे. यावेळी आयोग लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या जाणार आहेत. तसेच उत्तर प्रदेश, दिल्ली, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा या राज्यांसह लोकसभा निवडणुकीसाठी कोणत्या दिवशी आणि कुठे मतदान होईल यावर भाष्य करणार आहे.… Continue reading लोकसभा निवडणुकीसोबतच आता ‘या’ चार राज्यांमध्येही घोषणा***

निवडणूक आयोगाकडून पत्रकार परिषदेचे आयोजन; लोकसभा बिगुल उद्याच***

दिल्ली ( वृत्तसंस्था ) महाविकास आघाडीने आपले उमेदवार मैदानात उतरवत याबाबत उमेदवारांच्या घोषणा ही केल्या आहेत. यातच काही वेळापुर्वी निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार शनिवारी दिनांक 15 मार्च रोजी दुपारी तीन वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत 2024 च्या सार्वत्रिक (लोकसभा) निवडणुका आणि काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर होणार आहे.… Continue reading निवडणूक आयोगाकडून पत्रकार परिषदेचे आयोजन; लोकसभा बिगुल उद्याच***

मुंबईत 25.7 कोटींच्या GST रॅकेटचा पर्दाफाश, बनावट कंपनी तयार करत घातला गंडा

मुंबई ( वृत्तसंस्था ) 25.73 कोटी रुपयांच्या GST इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) फसवणूक करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बनावट वस्तू आणि सेवा कर (GST) इनव्हॉइस रॅकेटचा मुंबईत पर्दाफाश आज CGST (केंद्रीय वस्तू आणि सेवा कर) च्या तपास शाखेने केला आहे. या प्रकरणात आरोपी किरण कंथारियालाही अटक केली आहे. केंद्रीय वस्तू आणि सेवा कर पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनंतर,… Continue reading मुंबईत 25.7 कोटींच्या GST रॅकेटचा पर्दाफाश, बनावट कंपनी तयार करत घातला गंडा

कोल्हापूरचा गड काँग्रेसच लढवणार; शिक्का मोर्तबच्या पार्श्वभूमीवर ‘संभाजीराजें’चा मोठा निर्णय..!

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) या दोघांनाही हवा असलेला कोल्हापूरलोकसभा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला आल्याने आमदार सतेज पाटील यांच्या प्रयत्नांना यश आलं आहे. मुंबईत झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत घेण्यात आल्याची खात्रीलायक माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी आज बुधवारी होणाऱ्या महाविकासच्या बैठकीत शाहू छत्रपती… Continue reading कोल्हापूरचा गड काँग्रेसच लढवणार; शिक्का मोर्तबच्या पार्श्वभूमीवर ‘संभाजीराजें’चा मोठा निर्णय..!

ब्रिजभूषण, रमापती, संघमित्रासह ‘या’ खासदारांचा पहिल्या यादीतून पत्ता कट; चर्चांना उधान..!

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) केंद्रात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाने (भाजप) लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या तारखांची अधिकृत घोषणा होण्यापूर्वी त्यांच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. भाजपच्या पहिल्या यादीत एकूण 195 उमेदवार आहेत, त्यापैकी 51 उमेदवार उत्तर प्रदेश, राजकीय दृष्टीने देशातील सर्वात मोठे राज्य आहे. यूपीमध्ये लोकसभेच्या एकूण 80 जागा आहेत, त्यापैकी 29 वगळता… Continue reading ब्रिजभूषण, रमापती, संघमित्रासह ‘या’ खासदारांचा पहिल्या यादीतून पत्ता कट; चर्चांना उधान..!

लोकसभा: महाविकास आघाडीच्या उमेदवारावर आज होणार शिक्कामोर्तब ?

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) लोकसभा निवडणूकीचं बिगूल वाजण्यास अवघे काही दिवस उरलेले आहेत. या पार्श्वभूमीवर प्रत्येक राजकीय पक्षाने आपआपली मुठ बांधणी सुरु केली आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील मित्र पक्षांनी ही हालचाली सुरु केल्या आहेत. या पार्श्वभीवर आज राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार हे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर ते आमदार सतेज पाटील यांच्यासह राजर्षी… Continue reading लोकसभा: महाविकास आघाडीच्या उमेदवारावर आज होणार शिक्कामोर्तब ?

माझ्या जीवनसाथीची हत्या झाली तरी तुम्ही***; सोनिया गांधी भावूक

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) उत्तर प्रदेशातील रायबरेली येथील खासदार सोनिया गांधी यांनी आपल्या लोकसभा मतदारसंघातील लोकांना एक भावनिक पत्र लिहिलं आहे. सोनिया गांधी यांनी बुधवारी जयपूर गाठत राज्यसभा सदस्यत्वासाठी अर्ज दाखल केला आहे. 2019 मध्येच लोकसभा निवडणुकीच्या वेळी सोनिया गांधी यांनी पुढची निवडणूक न लढवण्याची घोषणा केली होती. आता त्या राज्यसभेद्वारे राज्यसभेत प्रवेश करतील.… Continue reading माझ्या जीवनसाथीची हत्या झाली तरी तुम्ही***; सोनिया गांधी भावूक

Hemant Soren : हिम्मत असेल तर पुरावे दाखवा; राजकारण सोडतो

रांची ( वृत्तसंस्था ) झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम) नेतृत्वाखालील आघाडीने गेल्या सोमवारी (६ फेब्रुवारी) विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकला. अपेक्षेप्रमाणे, 81 सदस्यांच्या सभागृहात त्याच्या बाजूने 47 मते मिळाली. विशेष न्यायालयाने विश्वासदर्शक ठरावावर मतदान करण्याची परवानगी दिल्यानंतर हेमंत सोरेन यांनी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते भाजपचे अमर बौरी आणि काँग्रेसचे संसदीय कामकाज मंत्री आलमगीर आलम यांच्यासह सभागृहाला भावनिक भाषण… Continue reading Hemant Soren : हिम्मत असेल तर पुरावे दाखवा; राजकारण सोडतो

”लोकसभेच्या पार्श्वभूमीवर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणाला सुरूवात”

पुणे ( प्रतिनिधी ) लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 5 ते 9 फेब्रुवारी दरम्यान भारत निवडणूक आयोगाने अधिकाऱ्यांचे विभागस्तरीय प्रशिक्षण सुरु केले आहे. यामध्ये सध्या पुणे विभागातील सर्व लोकसभा मतदार संघातील सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे विभागस्तरीय प्रशिक्षण सुरु करण्यात आले आहे. याचे उद्घाटन भारत निवडणूक आयोगाचे वरिष्ठ प्रधान सचिव एन.एन. बुटोलिया यांच्या हस्ते करण्यात आले. श्री. बुटोलिया… Continue reading ”लोकसभेच्या पार्श्वभूमीवर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणाला सुरूवात”

error: Content is protected !!