कोल्हापूर ( प्रतिनिधी ) काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) या दोघांनाही हवा असलेला कोल्हापूरलोकसभा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला आल्याने आमदार सतेज पाटील यांच्या प्रयत्नांना यश आलं आहे. मुंबईत झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत घेण्यात आल्याची खात्रीलायक माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी आज बुधवारी होणाऱ्या महाविकासच्या बैठकीत शाहू छत्रपती यांच्या उमेदवारीची घोषणा होणार असल्याची ही माहिती समोर आली आहे.

या पार्श्वभूमीवर संभाजीराजे छत्रपती यांची भुमिका काय ? यावरुन जोरदार चर्चा सुरु होती. संभाजीराजे छत्रपती यांनी आपली भुमिका स्पष्ट करत यावेळी लोकसभेतून आपण माघार घेतली असून 1000 % टक्के आपण श्रीमंत शाहू महाराजांच्या मागे उभे राहणार असल्याचं म्हटलं आहे.

असं असलं तरी कोल्हापूर व हातकणंगले हे दोन्ही मतदारसंघावर भाजप- शिवसेना युतीचा झेंडा होता. भाजपपासून काडीमोड घेतल्यानंतर शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हे दोन्ही मतदारसंघ लढविण्यासाठी कंबर कसली होती. मात्र, शिवसेनेने हातकणंगले लोकसभा मतदारसंघ माजी खासदार राजू शेट्टी यांना सोडत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघावरचा दावा अधिक घट्ट केला होता.

या जागेवर काँग्रेसने दावा ठोकताच पश्चिम महाराष्ट्रात लोकसभा लढवायला आमच्याकडे एकही जागा उरत नसल्याचे शिवसेनेचे म्हणणे होते. त्यामुळे चर्चेला उधान आलं होतं मात्र येत्या काही दिवसात हे देखील चीत्र स्पष्ट होणार आहे.