कोल्हापूर ( प्रतिनिधी ) लोकसभा निवडणूकीचं बिगूल वाजण्यास अवघे काही दिवस उरलेले आहेत. या पार्श्वभूमीवर प्रत्येक राजकीय पक्षाने आपआपली मुठ बांधणी सुरु केली आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील मित्र पक्षांनी ही हालचाली सुरु केल्या आहेत.

या पार्श्वभीवर आज राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार हे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर ते आमदार सतेज पाटील यांच्यासह राजर्षी शाहू महाराज छत्रपती यांची भेट घेणार आहेत त्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवारावर आज शिक्कामोर्तब होणार ? अशी चर्चा वेग धरु लागली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार शहीद कॉम्रेड गोविंद पानसरे स्मारक लोकार्पण सोहळा आज मंगळवार, दि. 20 फेब्रुवारी, 2024 रोजी सायं. 5 वाजता वि. स. खांडेकर प्रशाला प्रांगण, प्रतिभानगर, कोल्हापूर येथे पार पडणार आहे. या सोहळ्याचे उद्घाटन जेष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्या शुभहस्ते व श्रीमंत छत्रपति शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे. या कार्यक्रमाला खासदार डी राजा आमदार बाळासाहेब थोरात, कॉ भालचंद्र कांगो आमदार सतेज पाटील, पी. एन. पाटील, ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव, उदय नारकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

यानंतर शरद पवार हे आमदार सतेज पाटील यांच्यासह श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या घरी रात्रीच्या जेवनाचा बेत केला असून, यादरम्यान लोकसभेसाठीच्या उमेदवार कोण ? यावर चर्चा होणार असून, चर्चेअंती उमेदवाराच्या नावावर शिक्का मोर्तब होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आज फैसला होणार असल्याची चर्चा ही राजकीय वर्तूळात सुरु आहे.