कोल्हापूर ( प्रतिनिधी ) डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्यावतीने आयोजित जमिनीचे रेखांकन करण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाद्वारे ‘कंटूर मॅप’ म्हणजेच समोच्च भौगोलिक नकाशा बनवण्याची कार्यशाळा बहिरेश्वर (ता. करवीर) येथे उत्साहात संपन्न झाली. या नकाशामुळे जमिनीचे उंच व सखल भाग ओळखता येतात. पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी या नकाशाचा उपयोग होतो.

या एक दिवसीय कार्यशाळेमध्ये डिफरन्शियल जीपीएस(डीजीपीएस) व ड्रोन या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. यामध्ये या यंत्रांची ओळख, अक्षांश व रेखांश रेकॉर्ड करणे व या रेकॉर्डनुसार कंटूर मॅप (Contour Map) बनवणे याची परिपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. डिफरेंशियल जीपीएसच्या अंतर्निहित प्रिमाइससाठी बेस स्टेशन म्हणून ओळखला जाणारा जीपीएस रिसीव्हर सेट करणे आवश्यक आहे. बेस स्टेशन रिसीव्हर उपग्रह सिग्नलच्या आधारे त्याच्या स्थानाची गणना करतो आणि या स्थानाची तुलना ज्ञात स्थानाशी करतो. रोव्हिंग जीपीएस रिसीव्हरद्वारे रेकॉर्ड केलेल्या जीपीएस डेटावर फरक लागू केला जातो. स्थापत्य अभियांत्रिकी मध्ये द्वितीय वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला.

इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्यूनिकेशन डिपार्टमेंटमदील गरुडा क्लबचा सहाय्याने ड्रोन टेक्नॉलजीचा वापर करून कंटूर मॅपिंग करण्यात आली. गरुडा क्लबमध्ये ड्रोन टेक्नॉलजीवर रिसर्च अँड डेवलपमेंटचे काम केले जाते. गरुडा क्लबच्या विद्यार्थी समन्वयाकानी ड्रोणचा साह्याने मंदिराचा पूर्ण परिसराचे निरीक्षण करून छायाचित्र घेतली गेली. या कार्यशाळेच्या आयोजन स्थापत्य अभियांत्रिकीच्या प्रा. पवन नाडगौडा, प्रा. देशभूषण पाटील व प्रा अमृता भोसले व इ एन टी सी विभागाच्या प्रांजल फराकटे यांनी केले. बहिरेश्वर गावच्या सरपंच व ग्रामस्थांचे सहकार्य लाभले.