कोल्हापूर ( प्रतिनिधी ) शिवाजी विद्यापीठात आयोजित ‘अन्वेषण’ (पश्चिम विभाग) विद्यार्थी संशोधन महोत्सवात डी. वाय पाटील अभिमत विद्यापीठाचा दोन विद्यार्थ्यांच्या संशोधन प्रकल्पांना प्रथम क्रमांकाने सन्मानित करण्यात आले. देशभरातील तरुणाईमध्ये संशोधकीय दृष्टीकोन आणि सृजनशीलता यांना चालना देण्याच्या हेतून हा उपक्रम राबविण्यात आला.

या महोत्सवात पदवी स्तरापासून ते पीएचडी संशोधकांपर्यंतच्या अभिनव संकल्पनांवर आधारित संशोधन प्रकल्पांचा समावेश होता. पश्चिम विभागामधील महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, गुजरात व राजस्थान या पाच राज्यांतील 11 विद्यापीठांच्या एकूण 108 संशोधक विद्यार्थ्यांनी महोत्सवात सहभाग घेतला. त्यांनी एकूण 64 संशोधन प्रकल्प सादर केले.

यामध्ये डी वय पाटील अभिमत विद्यापीठाच्य मूलभूत विज्ञान व उपयोजित विज्ञान विभागात सर्गुण तुषार बासराणी तर अभियांत्रिकी व तंत्रज्ञान विभागात लीना चौधरी यांच्या मेफ्लोक्विन इनहबीटेड एल्गोस्टीरॉइड बायोसेंथेसिस कँडिडा अल्बिकॅन, टिश्यु इंजिनिअर्ड ईअर पिना या दोन प्रकल्पाना प्रथम क्रमांक पटकावला.

यावेळी एआययू सहसंचालक व संशोधन विभागाचे प्रमुख डॉ. अमरेंद्र पाणी, कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, एआययूच्या सहाय्यक संचालक डॉ. उषा राय नेगी आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. प्रकाश गायकवाड उपस्थित होते.